चित्रातून अमूर्ताची मांडणी

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

चित्रातून अमूर्ताची मांडणी

”राजेशची चित्रे, पाहणाऱ्याला रंगांच्या दुनियेत, वास्तवाच्या पलीकच्या अंतराळात (space) घेऊन जातात.

दैनिक गोमन्तक

राजेश चोडणकर चित्रकलेच्या (Painting) क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ काम करतो आहे आणि चित्रकलेच्या अनेक प्रकारात त्याने काम केले आहे, (लँडस्केप, पोट्रेट, फिगरेटिव्ह पेंटिंग...इत्यादी.) अलीकडे त्याच्या चित्रांच्या प्रक्रियेत रंग, छटा, रेषा, ठिपके इतर घटक याबद्दल तो करत असलेला विचार स्पष्ट दिसतो.राजेश म्हणतो “चित्रावर काम करत असताना ते चित्रएखाद्या फुलासारखे उलगडत जाते.

चित्रे पूर्णत्वाची आणि समाधानाची आणि शांततेची भावना देतात. प्रत्येक चित्र स्वत:हून, अमूर्त स्वरूपात आकार घेण्यासाठी, रंग आणि त्यांच्या छटांवर सुक्ष्मपणे लक्ष केंद्रित करून विभिन्न रंग निवडते.चित्रातून एरवी आढळणाऱ्या परिचित आकारांची अनुपस्थिती प्रत्येकाला चित्रांची स्वतःची व्याख्या स्वतंत्रपणे करण्याची मुभा देते.”राजेशची चित्रे, पाहणाऱ्याला रंगांच्या दुनियेत, वास्तवाच्या पलीकच्या अंतराळात (space) घेऊन जातात. राजेश चोडणकर यांची ही चित्रे ‘सूर्यकिरण हेरिटेज’च्या दालनात सुरु असलेल्या ‘स्पेसेस अॅन्ड डायमेन्शन्स’ या चित्रकला प्रदर्शनाचा भाग आहेत.

वासिली कांदिंस्कीने अमूर्त चित्रांच्या व्याख्येची मांडणी समर्पकपणे केली. त्याच्या म्हणण्यानुसार अमूर्त चित्रांनी कलेचा (Art) उद्देश तपासला पाहिजे. रंग आणि आकार मानवी मनावर कसा प्रभाव टाकतात याचेही निरीक्षण केले पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी पलीकडे गेले पाहिजे. अमूर्त कला कुठल्याच परंपरेचे प्रतिनिधित्व करत नसल्यामुळे त्यातील रंग आणि आकार स्वतःचे स्वत्व प्रदर्शित करू शकतात आणि त्यांच्या आत्म्याच्या भावना व्यक्त करू शकतात. अशाप्रकारे ‘अमूर्तता’ हा एक आंतरिक प्रवास बनतो, जो अतिशय खोलवर जाऊन आत्म्यावर भार घालतो.

पहिली अट म्हणजे चित्र (Picture) (काढता येणे. दुसरं म्हणजे रचना आणि रंगांबाबत संवेदनशील असणे आणि सर्वात महत्त्वाचे,- चित्रकाराने कवी असणे!

– वासिली कांदिंस्की, रशियन चित्रकार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT