Ovarian Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ovarian Cancer: महिलांनो, गर्भाशयाचा कर्करोग होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच सावध व्हा

Ovarian Cancer Early Signs: गर्भाशयाचा कर्करोग आजार सुरुवातीला सौम्य लक्षणांमुळे दुर्लक्षित होतो, पण योग्य वेळी ओळखल्यास उपचार शक्य असतात. त्यामुळे शरीर देणारे काही संकेत ओळखणे अतिशय आवश्यक आहे.

Sameer Amunekar

गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे. तो मुख्यतः गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तरात (Endometrium) सुरू होतो, म्हणून त्याला ‘एंडोमेट्रियल कर्करोग’ असंही म्हणतात. हा आजार सुरुवातीला सौम्य लक्षणांमुळे दुर्लक्षित होतो, पण योग्य वेळी ओळखल्यास उपचार शक्य असतात. त्यामुळे शरीर देणारे काही संकेत ओळखणे अतिशय आवश्यक आहे.

गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशय हा महिलांच्या प्रजनन एक महत्त्वाचा अवयव आहे. गर्भधारणेदरम्यान बाळाचा विकास गर्भाशयात होतो. या गर्भाशयाच्या आतील पातळ अस्तरावर (एंडोमेट्रियम) जेव्हा अनियंत्रित पेशींची वाढ होते, तेव्हा त्याला गर्भाशयाचा कर्करोग म्हणतात.

कर्करोग होण्यापूर्वी शरीर देत असलेले महत्त्वाचे संकेत

1. अनियमित योनीस्त्राव

महिलांमध्ये कर्करोगाचं हे सगळ्यात सामान्य लक्षण आहे. मासिक पाळी संपल्यानंतर (menopause) रक्तस्राव होणे, किंवा मासिक पाळी दरम्यान अत्याधिक किंवा अनियमित रक्तस्त्राव हा चेतावणीचा संकेत असू शकतो.

2. योनीतून येणारा पिवळसर किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव:

साधारणपणे योनीस्त्राव सामान्य असतो, परंतु त्यात दुर्गंध येणे, रंग बदलणे किंवा जास्त प्रमाणात स्त्राव होणे हे गर्भाशयातील असामान्य स्थितीचे लक्षण असू शकते.

3. पोटाच्या खालच्या भागात वेदना:

खासकरून कंबरेखाली, पेल्व्हिस परिसरात कायमस्वरूपी किंवा वारंवार होणाऱ्या वेदना देखील गर्भाशयाच्या आजाराचे संकेत देऊ शकतात.

4. लघवी करताना जळजळ किंवा वेदना:

गर्भाशयात गाठ झाल्यास ती मूत्राशयावर दाब देऊ शकते, त्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे यासारखी लक्षणं दिसू शकतात.

5. थकवा आणि वजनात अचानक घट:

कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही महिलांमध्ये थकवा जाणवतो किंवा वजन कमी होऊ लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास रोग पुढे वाढू शकतो.

महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगावर एक महत्त्वपूर्ण संशोधन ब्रिस्बेनमधील क्वीन्सलँड विद्यापीठात करण्यात आले आहे. या संशोधनात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, काही लक्षणांवर वेळेत लक्ष दिल्यास गर्भाशयाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येऊ शकतो. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्याची शक्यता अधिक वाढते.

शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतं. अनियमित रक्तस्राव, पेल्व्हिक वेदना, अती स्त्राव याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतंही असामान्य लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत निदान व उपचार केल्यास गर्भाशयाच्या कर्करोगावर यशस्वीपणे मात करता येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. दैनिक गोमन्तक अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT