Office Lunch Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Office: ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येतीय? मग करा 'हे' काम

Office Lunch: जर तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येत असेल तर तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Puja Bonkile

office lunch how to control sleepiness after lunch in office

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर तुम्हालाही झोप येते का? झोपेमुळे काम करणे कठीण होते का? असे झाले तर ही समस्या तुमच्या एकट्याची नाही. अनेक लोक या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून अनेक लोक घरी उशिरा पोहोचतात. मात्र, पुढील उपाय करून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

लगेच काम करू नका

जेवण झाल्यानंतर लगेच कामावर बसू नका. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर, वेगाने चालावे. तुम्ही पायऱ्या चढू शकता. हे रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढविण्यात मदत करेल, ज्यामुळे तुमची उर्जा पातळी वाढेल.

खुप जेवण करणे

दुपारच्या जेवणात जास्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. याशिवाय तुमच्या आहारात फळांचा समावेश करावा. यामुळे ऊर्जा वाढते आणि झोप येत नाही.

प्रोसेस केलेले पदार्थ टाळा

दुपारच्या जेवणात प्रोसेस केलेले पदार्थ किंवा जास्त गोड खाणे टाळावे. प्रोसेस केलेले पदार्थ खूप लवकर पचतात, त्यामुळे ब्लड शुगरमध्ये वाढ होते आणि ऊर्जा कमी होऊ लागते.

झोपेची योग्य वेळ

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येत असेल तर रात्री झोपण्याची एक वेळ निश्चित करावी. अनेक वेळा आपण रात्री उशिरा झोपतो त्यामुळे आपल्याला दिवसा झोप येते.

हायड्रेट ठेवा

ऑफिसमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवावे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही थकवा येतो आणि ऊर्जा कमी होते. यासाठी दुपारच्या जेवणापूर्वी पाणी प्यावे आणि जेवणानंतर काही वेळाने पाणी प्यावे. यामुळे झोप येणार नाही.

संगीत ऐकावे

जेवण केल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते संगीत ऐकू शकता. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल आणि तुम्ही झोपू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

SCROLL FOR NEXT