Tips on Office Anxiety Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Office Anxiety: ऑफिसला जायची इच्छा होत नाही? 'ही' गोष्ट करा अन् पाहा रिझल्ट...

Tips on Office Anxiety: एकच वेळी अनेक काम करताना आणि वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांमुळे कामाच्या ठिकाणी तणाव वाढतो.यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Tips on Office Anxiety: अनेक लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवतात. ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट हातात असणे आणि वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांमुळे कामाच्या ठिकाणी तणाव वाढतो. यामुळे काही लोक शॉर्ट टेम्पर्ड होतात तर काहींना डोकेदुखी किंवा शरीरदुखीचा त्रास सुरू होतो.

महिलांमध्येही या प्रकारचा ताण धोकादायक मानला जातो. मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, कामाच्या ठिकाणच्या चिंतेमुळे व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात.

यामुळे ऑफिसच्या तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

चिंता दूर करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • वेळेचे व्यवस्थापन करावे

जर तुम्ही ऑफिसमधील तुमचे काम वेळेवर पूर्ण केले तर तुमची अर्धी चिंता आपोआप कमी होईल. पण अनेक लोक बराच वेळ सोशल मीडियावर घालवतात. यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो. म्हणून डेडलाइच्या आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

  • मित्रांसोबत वेळ घालवावा

जे लोक बहुतांश वेळ एकटे घालवतात त्यांच्यामध्ये निराशा आणि दुःख जास्त दिसून येते. यामुळे नेहमी मित्रांसोबत किंवा कुटूंबासोबत वेळ घालावा. यामुळे मानसिक आरोग्य वाढेल आणि तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे व्हाल.

  • पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप घतल्यास तणाव कमी होतो. तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. यामुळे रात्री 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्यावी. झोपताना फोन दूर ठेवावा. यामुळे झोपेची पद्धत सुधारेल आणि तणावाची समस्या दूर होईल.

  • नकारात्मक विचारांना दूर ठेवा

अनेक वेळा आपण स्वतःला कमकुवत समजतो. त्यामुळे आपल्या समस्या वाढतात. यामुळे नकारात्मक विचारांपासून स्वत:ला दूर ठेवावे. तुमची ताकद ओळखा आणि लहान यश साजरे करायला सुरुवात करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि यश सहज मिळते.

  • टॉक्सिक सहकाऱ्यांपासून दूर राहावे

प्रत्येक कामाच्या ठिकाणी असे काही लोक असतात जे नकारात्मकतेने भरलेले असतात. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले असते. कारण त्यांच्यासंपर्कात आल्याने तुमचे कामापासून लक्ष विचलित होऊ शकते. तुम्ही कामात मागे पडल्यास तुमचा तणाव वाढतो.

  • व्यायाम करा

व्यायामाचा केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. योगा केल्याने तुम्ही फ्रेश राहता आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळते. म्हणूनच, जर तुम्हाला ऑफिसमधील तणाव कमी करायचा असेल तर नियमितपणे योगा करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT