New Year Gift Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year Gift Idea: नवीन वर्षावर जोडीदाराला देऊ शकता 'हे' खास गिफ्ट, नात्यात वाढेल गोडवा

Relationship: नवीन वर्षात तुमच्या जोडीदाराला खास गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Puja Bonkile

Relationship: 2024 वर्ष जवळ येत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोषात तयारी सुरू आहे. हे नवीन वर्ष खास बनवण्यासाठी आपल्या प्रियजनांसोबत नवीन वर्ष साजरे करणे गरजेचे आहे. यंदा तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम वाढेल.

तुम्ही तुमच्या जोडीदाराला नवीन वर्षात खास भेटवस्तू देऊ शकता. भेटवस्तू देणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण त्यांना आवडेल असं गिफ्ट शोधणे याबाबत विचार करणे गरजेचे असते. तुम्ही पुढील काही वस्तू जोडीदाराला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

फोटो फ्रेम

तुम्ही दोघांचे फोटो मिळून फोटो फ्रेम बनवू शकता. ही भेट सर्वात खास असेल. तुमच्या पतीला ही भेट नक्कीच आवडेल. अशा भेटवस्तू नेहमी लक्षात राहतात.

हेडफोन

जर तुमच्या जोडीदाराला गाणी ऐकण्याची आवड असेल तर नवीन वर्षात हेडफोन्स गिफ्ट करू शकता. बजेटमध्ये असण्याव्यतिरिक्त ते एक चांगले गिफ्ट आहे. त्याचा वापर तो त्याच्या दैनंदिन जीवनातही करू शकतो. नुसती गाणी ऐकण्यासाठीच नाही तर बोलण्यासाठीही करू शकतो.

वॉलेट

आजकाल स्मार्ट वॉलेटही बाजारात उपलब्ध आहेत. जर तुमचा नवरा त्याच्या वस्तू ठेवायला विसरला तर तुम्ही त्याला एक स्मार्ट वॉलेट भेट म्हणून देऊ शकता. तुम्ही हे स्मार्ट वॉलेट ट्रॅक करू शकता आणि ते कुठे ठेवले आहे ते शोधू शकता.

डिनर डेट

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नवर्‍यासाठी नवीन वर्षानिमित्त डिनर डेट प्लॅन करू शकता. त्यांना न कळवता तुम्ही प्लॅन केलेल्या ठिकाणी घेऊन जावे. ही एक भेट सर्वोत्तम भेट असू शकते. तुमच्या पतीला हे खुप आवडेल.

परफ्यूम

तुम्ही नवीन वर्षाच्या या खास प्रसंगी तुमच्या जोडीदाराला गिफ्ट म्हणून परफ्यूमही देऊ शकता. ज्या कंपनीचे त्याला परफ्यूम वापरायला आवडते त्याच कंपनीचे परफ्यूम तुम्ही त्याला गिफ्ट करू शकता. तो त्याचा वापर आवडीने करेल.

ब्रँडेड घड्याळ

तुम्ही तुमच्या जोडीदाराला ब्रँडेड घड्याळ देखील देऊ शकता. प्रत्येकजण घड्याळ वापरतात. त्यामुळे बाजारात अनेक मोठ्या ब्रँडची घड्याळे अतिशय सुंदर असतात. तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमच्या पतीला भेट म्हणून एक घड्याळही देऊ शकता. या अशा गोष्टी आहेत ज्या दैनंदिन जीवनशैलीत वापरल्या जाऊ शकतात.

आयफोन

जर तुमच्या जोडीदार महागड्या फोनचा शौकीन असेल, तर तुम्ही या वर्षी त्याला आयफोन देऊन खुश करू शकता. तुम्ही तुमच्या पती किंवा प्रियकरासाठी नुकताच रिलीज झालेला iPhone 15 खरेदी करू शकता. तुम्ही त्यांना हे खास गिफ्ट देऊन त्यांना खुश करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT