New Year 2024 Diet Plan: वजन कमी करणे देखील एक कमाच आहे. जर तुम्ही वर्षभर वजन नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि तरीही वजन नियंत्रणात ठेवता येत नसेल, तर तुम्हाला तुमच्या डाएट प्लॅनमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
असं असलं तरी नवीन वर्षासाठी लोक विविध प्रकारची संकल्प करतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी नवीन वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प करा आणि हा डाएट प्लॅन फॉलो करा. मग बघा 2024 मध्ये तुमचे वजन लगेच नियंत्रणात येईल आणि वजन कमी करण्यासोबतच तुम्ही अनेक आजारंपासून दूर राहाल.
नव वर्षात फॉलो करा हा डाएट प्लॅन
तुळशीच्या पानांचा समावेश
नवीन वर्षापासून तुम्ही या सोप्या डाएट प्लॅनचे पालन केल्यास, पुढील वर्षात तुम्ही स्वतःला स्लिम, ट्रिम आणि हेल्दी दिसाल. यासाठी तुम्हाला तुमच्या दुधाचा चहा तुळशीची पानं टाकून घ्यावा लागेल. तुळशीच्या चहाने तुमचे वजनही नियंत्रणात राहते आणि तुमची तणावाची पातळीही कमी होऊ लागते.
प्रोटिनयुक्त पदार्थ
तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पादर्थांचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी तर मिळेलच पण दिवसभर पोट भरलेले राहिल. नाश्त्यात बेसन चिल्ला, मूग डाळ डोसा, मोड आलेले मूग आणि हिरवे मूग चाट असे पदार्थ खावे. यामुळे तुमची चयापचय देखील वाढेल.
मेथी दाणा
आपल्या आहारात मेथी दाण्याचा समावेश करावा. यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि तुमची भूकही वाढेल.
व्यायाम
रोज सकाळी व्यायाम करावा. सूर्यनमस्कारासोबतच हलका व्यायामही करू शकता. तुम्ही योगा देखील करू शकता. यामुळे शरीराला तसेच मनाला शांती आणि लाभ मिळतो.
कोमट पाणी
सकाळी कोमट पाणी प्यावे. हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते. त्यामुळे अन्न लवकर पचते. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुमचे पोटही निरोगी राहते.
ग्रीन टी
संध्याकाळी ग्रीन टी पिण्याची सवय लावावी. ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅटेचिन चयापचय वाढवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
भरडधान्य
तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करावा. नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारख्या संपूर्ण धान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्ससह आहारातील फायबर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.