Ramadan 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ramadan 2023: रमजानमध्ये उपवास करताना 'या' गोष्टी करणे टाळा

रमजानच्या काळात उपवास करणार्‍यांनी त्यांच्या खाण्यापिण्याशी संबंधित कोणतीही चूक करू नये

दैनिक गोमन्तक

Ramadan Fasting Mistakes: इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा महिना म्हणून साजरा केला जातो. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोक संपूर्ण महिना उपवास करून अल्लाहची पूजा करतात.

यादरम्यान रोजेदार सेहरी आणि इफ्तारीच्या स्वरूपात दिवसातून दोनदाच खातात. यामुळे या काळात उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याशी संबंधित कोणतीही चूक करू नये.

या चुकांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रमजानमध्ये उपवास करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

  • रमजानध्ये उपवास करताना आहाराशी संबंधित या चुका करु नका

रमजानमध्ये उपवास करताना दिवसभर उपाशी राहावे लागेल असा विचार करून कधीही जास्त खाऊ नका. सेहरी असो किंवा इफ्तारी, तुमच्या आहारात नेहमी हेल्दी गोष्टींनाचे सेवन करावे. जास्त खाण्याचा तुमचा विचार तुमचे आरोग्य बिघडू शकतो.

रमजानच्या काळात जर तुम्ही हृदयरोगी असाल, मधुमेही असाल किंवा रक्तदाबासारख्या इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, तर उपवासामुळे तुमचे औषध सोडू नका. असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

रात्री झोपण्यापूर्वी (Sleep) एक तास आधी खाणे पिणे बंद करावे. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप मिळेल.

उन्हाळ्यात (Summer) जास्त वेळ बाहेर राहिल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढू शकतो. या काळात उपवास करणाऱ्यांनी जास्त उन्हात जाणे टाळावे.

सहरीच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तासानंतर पाणी प्या. जेणेकरून दिवसभर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.

एनिमियाचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी उपवास करू नये.

 रमजानमध्ये तळलेल्या गोष्टींऐवजी फायबरयुक्त पदार्थांना आहाराचा भाग बनवा. असे केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि पोट भरलेले राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

Oceanman Controversy: ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? 'ओशनमन'वरुन फेरेरांचा सवाल; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

Goa Today's News Live: वाळपईत घराला आग; बाईक, वॉशिंग मशीन आणि शेड जळून खाक

Savarde: सावर्डे ग्रामसभी तापली! निधी गैरवापरावरून गदारोळ; तासभर गोंधळ, आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण

Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

SCROLL FOR NEXT