Navratri Garba Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Garba: नवरात्रीत गरबा का खेळला जातो ? वाचा एका क्लिकवर

नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनानंतर नवरात्र आनंदात आणि निर्बधमुक्तपणे साजरा केला जात आहे. नवरात्रीत 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते.तसेच या नऊ दिवसांत मातारणीच्या नऊ रूपांची पूजा करून आशीर्वाद घेतले जाते. ठिकठिकाणी मोठमोठे पँडल लावण्यात आले आहेत. नवरात्रीत गरबा खेळण्याची परंपरा फार जुनी आहे. या दिवसात दुर्गा मातेची पूजा आणि तिचा जयजयकार देशभर गुंजत असतो. विशेषत: गुजरातमध्ये दांडिया खेळून ही नवरात्र विशेष पद्धतीने साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला गरबा का खेळला जातो? हे सांगणार आहोत.

गरब्याची सुरुवात कुठून झाली?

नवरात्रीत गरबा (Garba) आणि दांडिया खेळण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. पूर्वी हे भारतातील गुजरात आणि राजस्थान सारख्या पारंपारिक ठिकाणी खेळले जात होते. परंतु हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आहे. गरबा या शब्दाकडे लक्ष दिले तर हा शब्द कर्म आणि दीप यांनी बनलेला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीच्या भांड्यात अनेक छिद्रे करून दिवा लावला जातो. यासोबतच ते चांदीचे नाणेही ठेवतात. या दिव्यालाच दीप गर्भ म्हणतात.

दीपगर्भ घटस्थापनेजवळ महिला रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून मातृशक्तीसमोर नृत्य करून त्यांना प्रसन्न करतात जर आपण दीप गर्भाबद्दल बोललो तर ते स्त्रीच्या सर्जनशील शक्तीचे प्रतीक आहे आणि गरबा हे या दीप गर्भाचे अपभ्रंश रूप आहे.

गरबा कसा खेळायचा?

गरबा नृत्य अनेक प्रकारे आणि अनेक गोष्टींसह केले जाते. महिला आणि पुरुष गरब्यात टाळी,दांडिया आणि मंजिरांचा वापर करतात. ताल जुळवण्यासाठी स्त्रिया आणि पुरुष दोन-चार गटात नाचतात. गरबा नृत्यात मातृशक्ती आणि कृष्णाच्या रासलीला संबंधित गाणी गायली जातात. गुजरातमधील लोकांचा असा विश्वास आहे की गरबा नृत्य आईला खूप प्रिय आहे, म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी नवरात्रीत गरब्याचे आयोजन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT