Navratri Fast: यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. उपवासा दरम्यान आपण काय खातो आणि काय पितो याची खूप काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा आपल्या शरीरात पोषक घटकांची कमतरता भासते. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येऊ शकते. नवरात्रीच्या उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
नवरात्रीत हरभऱ्याचे सेवन करणे फायदेशीर असते. हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबरसह अनेक पोषक घटक असतात. यामुळे उपवासा दरम्यान पोटासंबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही. हरभरा भिजत ठेवाव. यापासून तुम्हीही विविध पदार्थ बनवून खाऊ शकता.
कुट्टुचे पीठ
उपवासा दरम्यान कुट्टुचे पीठ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात. तुम्ही यापासून उपवासाचे पकोडे, पराठे, चीला यासारखे पदार्थ बनवु शकता. हे पीठ कुट्टु या त्रिकोणी फळापासून तयार होते. हाड आणि दात मजुबत राहतात. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.यामुळे हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहते.
फळं
उपवासा दरम्यान एनर्जेटिक राहायचे असेल तर फळांचे सेवन करावे. तसेच तुम्ही फळांचा ज्युस देखील पिऊ शकता. फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि शरीरात पाण्याची पातळी संतुलिक राहते. तुम्ही संत्रा, सीताफळ, सफरचंद, डाळिंब, अननस यासारख्या फळांचे सेवन करू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.