Navratri Day 4 Rashi Bhavishya in Marathi | Daily Horoscope 18 October 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Rashi Bhavishya: नवरात्रीचा चौथा दिवस; 'या' राशीच्या लोकांना नवदुर्गा देईल बळ

Kavya Powar

नवरात्रीचा चौथा दिवस - निळा रंग

नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडाचा असतो. गडद निळा रंग संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण आणि अत्याधुनिक बनवतो. हा रंग धारण केल्याने कुष्मांडा मातेचा आशीर्वाद मिळतो.

  • मेष

प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील.  (Daily Horoscope 18 October 2023)

  • वृषभ

या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवू शकतात. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

आपले मत मांडण्यास कचरु नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल.

  • कर्क

मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. 

  • सिंह

आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. 

  • कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. 

  • तुळ

प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

  • वृश्चिक

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. 

  • धनु

आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. 

  • मकर

प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. 

  • कुंभ

दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल.

  • मीन

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर, त्यांच्याशी आज बोलू शकतात तथापि, बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT