Navratri Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2023: अष्टमीला चुकूनही करू नका 'या' गोष्टी अर्पण

अष्टमीच्या दिवशी देवीला तुटलेला तांदूळ किंवा तुटलेला नारळ अर्पण करणे अशुभ मानले जाते.

Puja Bonkile

Navratri 2023: 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या या उत्सवात अष्टमी तिथी सर्वात खास मानली जाते. कारण या दिवशी माता दुर्गा प्रत्येक घरात वास करते. अष्टमी तिथीला, दुर्गा देवीचे परम शांती स्वरूप महागौरीची पूजा केली जाते. लोक अष्टमीच्या दिवशी कन्या पूजा करतात आणि नऊ दिवसांचे उपवास संपवतात.
पण काही लोक नकळत अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेला अशा वस्तू अर्पण करतात, जे शुभ मानले जात नाहीत. चला कर मग जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

प्लास्टिक डब्बे

अनेकदा घरातील मुलींना बाजारात उपलब्ध टिफिन बॉक्स आणि प्लास्टिकच्या वस्तू दिल्या जातात. कमी बजेटमुळे लोक कन्या पूजेत या गोष्टींचाच वापर करतात. कन्यापुजनच्या पुर्वी माता दुर्गेच्या समोर या प्लास्टिकच्या वस्तु ठेवतात. पण प्लास्टिकच्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे त्यांना प्रार्थनास्थळापासून दूर ठेवावे.

या रंगाच्या बांगड्या

अनेकदा लोक कोणत्याही प्रकारच्या लाल बांगड्या माता दुर्गेला अर्पण करतात. या बांगड्यांमध्ये प्लास्टिक असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त लाल रंगाच्या साध्या काचेच्या बांगड्या देवीला अर्पण केल्या जातात

अशा प्रकारचे पदार्थ अर्पण करू नका

अष्टमीच्या दिवशी कन्यापुजनावेळी जेवण बनवताना काळजी घ्यावी. जेवण बनवताना लसूण आणि कांद्या वापर करू नका. कारण ते ताम्सिक मानले जाते असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे सात्विक पदार्थच बनवावे.

कन्या पुजेचे महत्व

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्या पुजनाला महत्व आहे. कारण कन्या पुजा केल्याशिवाय नवरात्रीचा उपवास अपुर्ण मानला जातो. कन्या पुजेसाठी सप्तमी,अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते.दहा वर्षा पर्यंतच्या मुलीं कन्याभोजनासाठी योग्य असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT