Mother-Daughter Relationship: आईचे तिच्या मुलांवर खुप प्रेम करते. विशेषत: मुलीसोबत आईचे नातं खूप सुंदर असतं. आई तिचे बालपण मुलीमध्ये घालवते. तिला तिच्या मुलीच्या माध्यमातून तिची स्वप्ने पूर्ण करायची असतात. वाढत्या वयाबरोबर आई आणि मुलीचं नातं मैत्रिणीसारखे बनतं. आईला प्रत्येक आनंद द्यायचा असतो, तर मुलगीही तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट आईसोबत शेअर करते. मुलीसाठी, आई ही कुटुंबातील ती सदस्य असते, जी तिला समजून घेत असते.
पण कधी कधी आई आणि मुलीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. आई आणि मुलगी यांच्यामध्ये दूरावा येण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु समस्या वेळीच सोडवल्या नाहीत तर त्यांच्यातील दूरावा अधिक वाढू शकतो. आई आणि मुलीमधील गोडवा वाढवण्यासाठी जाणून घ्या काय करावे.
प्रत्येक गोष्टीत अडवणूक करू नका
मुलीच्या चिंतेमुळे आई अनेकवेळा मुलीला प्रत्येक गोष्टींसाठी अडवणूक करते. काय करावे आणि काय करू नये हे सांगत असते. पण जेव्हा मुलगी मोठी होऊ लागते तेव्हा तिला आईचे असे वागणे आवडत नाही. यामुळे दोघींमध्ये दुरावा येऊ शकतो.
तुलना करू नका
अनेक वेळा पालक त्यांच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करतात. आई अनेकदा तिच्या मुलीसमोर दुसऱ्याच्या मुलीचे कौतुक करते. आईचे असे वागणे कधी कधी मुली मनावर घेतात.यामुळे आई आणि मुलीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. मुलीसोबत कधीच असे वागू नका.
चुका समजावून सांगा
जेव्हा मूल चूका करतात तेव्हा आई त्यांना रागावते. पण रागावल्याने मूलांमध्ये बदल होत नाही उलट ते अधिक बिघडू लागतात. जर मुलीने चूक केली तर तिला प्रेमाने समजावून सांगा, जेणेकरून तिला तुमचा मुद्दा समजेल आणि चुका पुन्हा करणार नाही. यामुळे दोघींचे नातं देखील घट्ट होण्यास मदत मिळते.
एकत्र वेळ घालवाव
आई आणि मुलीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी दोघींनी एकत्र वेळ घालवावा. मुली मोठ्या झाल्या की मैत्रीणींसोबत जास्त वेळ घालवतात आणि आईसोबत कमी वेळ घालवतात. आईसोबत गोष्टी कमी शेअर केल्याने आईचा मुलीवर संशय वाढतो. यामुळे आईसोबत घरी आल्यावर किंवा सट्टीच्या दिवस एकत्र वेळ घालवा. यामुळे आईच्या मनातील संशय कमी होऊन नातं दृढ होण्यास मदत मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.