Morning Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Recipe: लहान मुलांसाठी बनवा चटपटीत चीज मसाला आलू

लहान मुल नेहमीच काही तरी चटपटी खायला मागत असतात,अशा वेळी तुम्ही त्यांना ही खास रेसिपी बनवून देऊ शकता.

Puja Bonkile

Morning Recipe: घरातील लहान मुलांसाठी स्नॅक्स बनवणे सोपे नाही. कारण त्यांना रोज काही तरी नवनवीन पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे त्यांच्या स्नॅक्सच्या रोज वेगेवगळ्या मागण्या असतात.

जर तुमच्या मुलांना बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाट्यापासून टेस्टी आणि चटपटीत रेसिपी बनवु शकता. ही रेसिपी झटपट तयार होत असून मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया चीज मसाला आलू कसे बनवावे.

  • चीज मसाला आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उकडलेले छोटे बटाटे

चीज

चिली फ्लेक्स

हळद

जिरे पावडर

लाल तिखट

काळी मिरी पावडर

मीठ चवीनुसार

तेल गरजेनुसार

  • कृती

चीज मसाला आलू बनवण्यासाठी सरवात पहिले बटाटे उकळून घ्यावे.

नंतर थंड झाल्यावर सोलून घ्यावे.

आता कढईत तेल गरम करायला ठेवावे.

तेल गरम झाले की त्यात उकडलेले बटाटे घालावे.

नंतर बटाटे चांगले भाजून घ्यावे. सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळावे.

बटाटे पूर्णपणे भाजल्यावर त्यात मीठ, काळी मिरी पावडर, हळद, लाल तिखट, जिरेपूड घालून चांगले मिक्स करावे.

नंतर त्यावर किसलेले चीज घालावे.

सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करू शकता.

टिप: तुम्ही हिरव्या कांद्याची पात देखील टाकू शकता. तसेच बटाटे उकळण्यासाठी कमी पाणी वापरावे.

  • बटाटा खाण्याचे फायदे काणते

बटाट्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात आपल्या दैनंदिन गरजेच्या जवळपास निम्मं व्हिटॅमिन सी असते. बटाट्यामध्ये फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT