Rava Vada Recipe: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rava Vada Recipe: सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा कुरकुरीत रवा वडा!

सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन बोर झाले असाल तर तुम्ही चविष्ट रवा वडा खाऊ शकता.

Puja Bonkile

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न महिलांना जास्त पडतो. पोहे, उपमा खाऊन बोर झाले असाल तर तुम्ही ही चविष्ट रेसिपी ट्राय करु शकता. तुम्ही बटाटा, सांभर, दाल आणि दही वडा खाल्ला असेलच पण रवा वडाची चव चाखली आहे का? नाही तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

ही रेसिपी बनवाला अगदी सोपी असुन चवदार आहे. यासोबतच मुलांना रवा वडा खूप आवडेल, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया रवा वडा बनवण्याची सोपी रेसिपी

  • रवा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 वाट्या रवा

1 वाटी दही

1 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची

1 टीस्पून किसलेले आले

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर,

चिमूटभर हिंग,

1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,

1 टेबलस्पून चिरलेली कढीपत्ता,

1/4 बेकिंग सोडा चतुर्थांश चमचा,

तळण्यासाठी तेल

आवश्यकतेनुसार पाणी

चवीनुसार मीठ

  • रवा वडा बनवण्याची कृती

सर्वात पहिले रवा वडा बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात रवा घ्यावा आणि त्यात दही मिक्स करावे.

तसेच त्यात थोडे पाणी टाका आणि नीट मिक्स करून घट्ट पीठ बनवा.

नंतर त्यात मीठ टाकून दहा मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.

नंतर या पिठात आले, हिरवी मिरची, काळी मिरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि बेकिंग सोडा टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर हाताला थोडेसे पाणी लावून तळहातावर चमचाभर मिश्रण घेऊन गोळा तयार करावा.

आता हा गोळा दुसऱ्या हाताच्या तळव्याने दाबून त्याला वडाचा आकार द्या, त्यात बोटाच्या साहाय्याने छोटे छिद्र करावे.

दुसरीकडे कढईत तेल टाकून गरम करून त्यात वडा टाकून तळून घ्या.

तुमचा गरमागरम रवा वडा तयार आहे.

नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही आस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT