Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ता चांगला झाला तर दिवसभर मूड चांगला राहतो. तुम्हाला नाश्त्यात चटपटीत सोबत काहीतरी हेल्दी खायचे असेल तर तुम्ही ओट्स आलू कोबी कटलेट बनवू शकता. यात भाज्या आणि ओट्स असल्याने हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तुमची स्नॅक्स खायची इच्छा देखील पूर्ण करेल. विशेष म्हणजे तुम्ही ही रेसिपी संध्याकाळी चहासोबतही ट्राय करू शकता. चलला जाणून घेऊया कसे बनाववे ओट्स आलू कोबी कटलेट.
ओट्स आलू कोबी कटलेट बनवण्यासाठी लागणार साहित्य
1/2 कप ओट्स
1/2 कप फुलकोबी
2 उकळलेले छोटे बटाटे
1कांदा बारीक चिरलेला
2 बारिक चिरलेली हिरवी मिरची
1 कप ब्रेड क्रम्ब्स
4 चमचे बेसन
काळी मिरी पावडर
चवूनुसार मीठ
ओट्स आलू-कोबी कटलेट बनवण्याची कृती
कटलेट बनवण्यासाठी सर्वात पहिले बटाटा आणि फूलकोबी उकळून घ्यावी. आता एका मोठ्या बाऊल मध्ये उकलेले बटाटा, फूलकोबी आणि ओट्स घ्या आणि नीट मिक्स करून घ्यावे. आता यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बेसन आणि मीठ टाका आणि चांगले मिक्स करावे. आता या मिश्रण पासून कटलेट तयार करा. कटलेट बनवण्यासाठी मिश्रणाचा एक गोळा हातावर लाडूसारखा बनवा आणि त्याला थोडा दाब देऊन हलका चपटा करा. सर्व कटलेट ब्रेड क्रम्ब्स मध्ये नीट फिरवून घ्या.
आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. हे नीट पॅनवर सर्व बाजूंनी पसरवून घ्या आणि त्यावर कटलेट ठेवून शॅलो फ्राय करा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजा. तुमचे कटलेट रेडी आहे. तुम्ही हे कोथिंबीरच्या हिरव्या चटणी किंवा चिंचेच्या आंबट गोड चटणी सोबत सर्व्ह करू शकता. यासोबत टोमॅटो सॉस देखील चांगले लागते. तुम्ही या कटलेट मध्ये किसलेला गाजर, पनीर, शिमला मिरची सुद्धा टाकू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.