Moong Daal Halwa Recipe
Moong Daal Halwa Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Moong Daal Halwa Recipe : आनंदाच्या प्रसंगी बनवा चविष्ट मूग डाळ हलवा; रेसिपी घ्या जाणून

दैनिक गोमन्तक

गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यातीलच एक उत्तम पर्याय म्हणजे मूग डाळ हलवा. हा हलवा जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा असतो. कोणत्याही पार्टीत किंवा लग्नात मूग डाळीची खीर स्वीट डिश म्हणून दिली जाते. त्याची चव बाकीच्या पुडिंगपेक्षा खूप वेगळी असते आणि ती तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. आज आम्ही तुमच्यासाठी मूग डाळ हलवा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहे. त्यामुळे ही रेसिपी एकदा जरूर करून पहा.

मूग डाळीच्या हलव्यासाठी आवश्यक साहित्य

  • मूग डाळ

  • मावा

  • साखर

  • तूप

  • वेलची

  • बेदाणे

  • काजू

  • बदाम-पिस्ता

मूग डाळ हलवा बनवण्याची कृती :

प्रथम, मूग डाळ धुवून किमान 3 तास भिजत ठेवा. त्यानंतर बारीक वाटून घ्या आणि कढईत तूप घालून वाटलेली डाळ खरपूस भाजून घ्या. यानंतर मावा भाजून घ्या. यासाठी कढईत तूप गरम करून त्यात मावा टाकून भाजून घ्या.

नंतर भाजलेली डाळ आणि मावा दोन्ही एकत्र करून घ्या. नंतर साखरेचा पाक बनवून घ्या. त्यात भाजलेली डाळ आणि मावा घाला आणि सतत ढवळत असताना शिजू द्या आणि नंतर त्यात सर्व ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घाला.

याशिवाय त्यात वेलची पावडर टाकून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT