Monsoon Health Tips | Stomach Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Health Tips: पावसाळ्यात काय खावे अन् काय खाऊ नये? एकदा जाणून घ्याच

पावसाळ्यात कडक उन्हाळ्यापासून तर आराम मिळतोच पण पचन, ऍलर्जी आणि अन्नजन्य आजारही होतात.

दैनिक गोमन्तक

Monsoon Health Tips: पावसाळ्यात कडक उन्हाळ्यापासून तर आराम मिळतोच पण पचन, ऍलर्जी आणि अन्नजन्य आजारही होतात. हवामानातील आर्द्रता आपली पचनसंस्था कमकुवत करते, ज्यामुळे पोट बिघडण्याचा धोका वाढतो. चला जाणून घेऊया या ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये.

पावसाळ्यात पोटाचे आरोग्य राखण्यासाठी खास टिप्स

काय खाऊ नये

  • पावसाळ्यात जड अन्नपदार्थ खाऊ नका. पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे फुगणे, गॅस, आम्लपित्त इ. समस्या उद्भवू शकतात.

  • पावसाळ्यात पाणीपुरी, चाट वगैरे खाल्ल्याने पोटात संसर्ग होऊ शकतो.

  • बाहेरचे पाणीही पिऊ नका.

  • शीतपेये पिऊ नका कारण ते आधीच कमकुवत पचनाच्या अडचणी वाढवण्याचे काम करतात.

  • दुग्धजन्य पदार्थ घेऊ नका कारण ते पचायला जड असते.

  • पावसाळ्यात सीफूडचे अति सेवन देखील टाळावे.

काय खावे?

  • या दिवसात मध्यम प्रमाणात खा; सहज पचण्याजोगे आणि पोटाला पोषक असे हलके पदार्थ खा.

  • कॅमोमाइल-टी, ग्रीन-टी किंवा आले-लिंबू चहा यांसारखे हर्बल टी भरपूर प्या जे पचन सुधारण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात.

  • प्रोबायोटिक्सचे सेवन वाढवा. यामुळे गोष्टी तुमचे पचन सुलभ करून तुम्हाला निरोगी ठेवण्याचे काम करतात.

  • भरपूर पाणी प्या जेणेकरुन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर निघून जातील.

  • कारले, करवंद, भोपळा, मेथीदाणे, कडुलिंब अशा गोष्टी खाव्यात, त्यामुळे पचनक्रिया बळकट राहते. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

  • कच्च्या भाज्या खाण्याऐवजी त्या उकळून खाव्यात, यामुळे पोटाच्या संसर्गापासून बचाव होईल.

  • साखरेचे सेवन कमी करा, कारण यामुळे जळजळ वाढते आणि शरीरात बॅक्टेरिया वाढतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

SCROLL FOR NEXT