Body Itching in Monsoon Season Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Itching in Monsoon: पावसाळ्यात त्वचेला खाज सुटलीय? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या उद्भवत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Body Itching in Monsoon Season: पावसाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये आरोग्यासह त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. जसे की खाज सुटणे, पुरळ येणे यामुळे अनेकांना त्रास होतो.

शरीराच्या तापमानात बदल, हवेतील आर्द्रता वाढणे, जास्त घाम येणे, स्वच्छतेचा अभाव आणि कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जी आणि रसायनांच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात.

हे टाळण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. चला जाणून घेऊया हे उपाय कोणते आहे.

  • योग्य कपडे घाला

त्वचेच्या समस्या असल्यास फक्त सुती कपडे घालावे. सिंथेटिक कपडे किंवा जरी, लेस असलेले कपडे घालणे टाळावे.

यामुळे त्वचेत घर्षण होते आणि घाम येऊन समस्या जास्त वाढू शकते. यामुळे नेहमी सैल आणि योग्य कपडे घालावेत.

  •  तुमचे कपडे आणि सामान वेगळे ठेवा

त्वचेशी संबंधित समस्यांवर उपचार घेत असल्यास स्वत:चे कपडे आणि सामान नेहमी वेगळे ठेवावे. कपड्यांखालील टॉवेल-नॅपकिनसारख्या गोष्टी स्वच्छ धुवावे.

घरातील लहान मुले किंवा वडीलधारी व्यक्तींचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. कारण त्यामुळे संसर्ग किंवा ऍलर्जी वाढू शकते.

  • खाजवू नका

त्वचेशी संबंधित समस्या असल्यास त्वचेला खाजवू नका. अन्यथा अॅलर्जी किंवा इन्फेक्शन वाढू शकते.

कारण खाज सुटल्यामुळे नखांमध्ये आधीच असलेली घाण गंभीर समस्या निर्माण करू शकते.

  •  खाजवर घरगुती उपाय

त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे ही सामान्य ऍलर्जी असल्यास खोबरेल तेल, कापूर आणि कडुलिंबाचे तेल आराम देऊ शकते.

एकदा हे लावल्यावर समस्या कमी होत नसल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि लोशन वापरावे. 

  • साबणचा वापर

त्वचेच्या समस्या बर्‍याचदा खाज सुटणे आणि जळजळ होण्यापासून सुरू होतात.

यामुळे सर्वात पहिले साबण, परफ्यूम आणि बॉडी वॉश यासारखे केमिकल प्रोडक्ट वापरणे बंद करावे. कारण केमिकलमुळे ऍलर्जी वाढू शकते.

  • दागिने घालणे टाळावे

अनेक वेळा गळ्यातील चेन, नेकलेस किंवा हाताच्या बांगड्या ज्या धातूपासून बनवलेल्या असतात त्या घामाच्या संपर्कात आल्यावर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे आर्टिफियल दागिने घालणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT