Lucky Plant| Money plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Money Plant: कुंडीतील मनी प्लांटची वाढ होत नाहीय? ट्राय करा 'या' सिंपल ट्रिक्स

जर तुमच्याही घरातील मनी प्लांट सुकत असेल तर या ट्रिक्स तुम्हाला मदत करतील.

Puja Bonkile

Money Plant: अनेक लोकांच्या घरता तुम्ही मनी प्लांट पाहिला असेल. वास्तुशास्त्रात देखील मनी प्लांट घरता लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. पण मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी हे माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला मनी प्लांट हिरवागार आणि वाढ होण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • पाण्यात मनी प्लांट लावतांना घ्या काळजी

पाण्यात मनी प्लांट लावण्यासाठी दोन ते तीन मनी प्लांट घ्यावे

बाटलीचा तळ पाण्यात बुडेपर्यंतच पाण्याने भरावे.

मनी प्लांट लावतांना स्वच्छ पाणी वापरावे. तुम्ही फिल्टरचे पाणी वापरू शकता.

मनी प्लांटला थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका.

  • मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत

भांड्यात कोकोपीट मातीत मिसळून कंपोस्ट खत तयार करावे.

आता त्यात मनी प्लांट टाकावे, पानाची बाजू मातीच्या वर असावी.

माती ओले होईपर्यंत दररोज पाणी घालावे.

थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे.

  • मनी प्लांटला दाट आणि घेरदार करण्यासाठी काय करावे

रोपांची छाटणी केल्याने झाड अधिक दाट आणि उंच होते. मनी प्लांटची खराब किंवा कोरडी पाने वेळोवेळी काढून टाकावी. मनी प्लांटची कापणी करतांना काळजी घ्यावी, कारण यामुळे नवीन पाने वाढत नाही.

  • खत आणि पाण्याचे योग्य प्रमाण

जर तुम्ही पाण्यात मनी प्लांट लावला असेल तर त्याचे पाणी आठवड्यातून 2-3 वेळा बदलावे. जर तुम्ही जमिनीत मनी प्लांट लावला असेल, तर तुम्ही महिन्यातून एकदा शेण किंवा शेण पाण्यात विरघळवून जमिनीत टाकू शकता. त्यामुळे मनी प्लांटची वाढ झपाट्याने होते. 

  • हे उपाय ठरतील उत्तम

मनी प्लांटची वाढ योग्य करण्यासाठी, हळद किंवा मीठ त्याच्या कुंडीच्या मातीमध्ये मिक्स करू शकता. असे केल्याने त्यात बुरशीची वाढ होत नाही , पोषक तत्त्वे मिळण्याबरोबरच ती अधिकाधिक घट्ट होते. याशिवाय अनेक लोक मनी प्लांटमध्ये दुधाचे पाणीही टाकतात, असे मानले जाते की असे केल्याने त्याची वाढ झपाट्याने होते.

टिप: कोणतेही रासायनिक खत वापरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT