Virus  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mobile Virus: तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? वाचा एका क्लिकवर

तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस आहे की नाही हे कसे ओळखाल जाणून घेऊया.

Puja Bonkile

Mobile Virus: स्मार्टफोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर येणे आता सामान्य झाले आहे. व्हायरस हे एक प्रकारचे मालवेअर आहेत, जे स्वतःला नवीन रूप देतात. हे रक्तातील किड्यांसारखे असतात आणि एकदा का ते सिस्टममध्ये प्रवेश केला की त्यांची संख्या सतत वाढत जाते. त्यांच्या मदतीने हॅकर्स तुमच्या संपूर्ण सिस्टीमचा डेटा घेऊ शकतात आणि तुमची सिस्टीम सुद्धा ताब्यात घेऊ शकतात आणि सात समुद्र दूर बसून तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतात.

फोनवर व्हायरस कसे पोहोचतात?

अज्ञात लिंक्सवर क्लिक केल्यानंतर असे होऊ शकते.

अशा लिंक मेल, व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे पाठवल्या जातात.

जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा एक साइट उघडते आणि व्हायरस तुमच्या फोनवर पोहोचतात.

अज्ञात किंवा संशयास्पद साइटला भेट दिल्याने व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात.

Google Play Store किंवा Apple App Store व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्टोअरमधून ॲप डाउनलोड केल्यावर हे व्हॅरस फोनमध्ये येतात.

हॉटेल, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्टँड यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट करून केल्यास व्हायरस येऊ शकतात.

फोनमध्ये व्हायरस कसे शोधाल?

तुमच्या फोनमध्ये मालवेअर असेल तर गुगल तुम्हाला त्याबाबत अलर्टही पाठवते.

याशिवाय फोनमध्ये अनेक वेळा पॉपअप नोटिफिकेशन्स अशा ठिकाणी दिसतात जिथे त्या नसाव्यात.

फोनचा वेग अचानक कमी होणे हे देखील मालवेअरचे लक्षण आहे.

तुमच्या फोनचे स्टोरेज अचानक भरले असल्यास, तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.

तुमच्या फोनचा ब्राउझर तुम्हाला काही अश्लील किंवा अज्ञात साइटवर वारंवार रीडायरेक्ट करत असेल तर वेळीच सावध व्हा.

तुमच्या कुटुंबातील लोकांना असे मेसेज येऊ लागतात जे तुम्ही पाठवलेही नाहीत.

तुमच्या अँड्रॉइड फोनला व्हायरसपासून कसे दूर ठेवाल

कोणत्याही अज्ञात स्रोतावरून ॲप्स डाउनलोड करू नका.

कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रिव्यूज वाचा आणि हे ॲप आपला डेटा कसा वापरणार आहे ते समजून घ्या.

तुमच्या फोन आणि ॲप्सवर स्ट्रॉग पासवर्ड वापरा.

सर्व खात्यांसाठी किंवा ॲप्ससाठी समान पासवर्ड वापरू नका.

तुमच्या फोनची कॅशे मेमरी वेळोवेळी डिलीट करा.

तुमचा ब्राउझिंग इतिहास तपासत राहा आणि तुम्हाला माहीत नसलेला कोणताही साइट इतिहास दिसल्यास सतर्क व्हा.

तुमच्या फोनचे ॲप्स आणि फोन अपडेट करत रहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT