Goa News |Mobile Tower Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mobile Network Issue: मोबाईलची रेंज सारखी जातेय? कामय 'नेटवर्क'मध्ये राहण्यासाठी 4 सोप्या टिप्स

Rajat Sawant

Follow This Tips For Solve Mobile Network Issue: मोबाईल फोन हा आता काळाची गरज बनला आहे. या मोबाईलला जर चांगले नेटवर्क नसेल तर मोबाईल काहीच कामाचा राहत नाही. त्यामुळे मोबाईलला चांगले नेटवर्क कनेक्शन असणे गरजेचे आहे.

नेटवर्क नसल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला यावर काही उपाय सांगणार आहोत. ते तुम्हाला नेटवर्कचे चांगले सिग्नल मिळण्यास मदत करू शकतात.

मोबाईल फोनला नेटवर्क न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. घराचे दरवाजे किंवा खोलीच्या खिडक्या बंद असणे, जर तुमचा फोन 2G किंवा 3Gवर काम करत असेल अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला नेटवर्क मध्ये समस्या येवू शकतात.

स्मार्ट सिग्नल बूस्टर

मोबाइल सिग्नल सुधारण्यासाठी तुम्ही मोबाइल सिग्नल बूस्टर वापरू शकता. स्मार्ट सिग्नल बूस्टर वापरणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त ते प्लग इन करायचे आहे. हे अॅनालॉग सिग्नल बूस्टरपेक्षा थोडे अधिक महाग आहेत. मात्र, तुमच्या घरामध्ये सिग्नलची समस्या असल्यास हा एक चांगला पर्याय आहे.

सेल्युलर रिपीटरचा वापर

तुमच्या घरात चांगले नेटवर्क आहे, पण घरातील काही खोलीत नेटवर्कची समस्या असल्यास सेल्युलर रिपीटर तुमच्यासाठी एक चांगला आणि स्वस्त पर्याय असेल. सेल्युलर रिपीटर 2 हजार 500 ते 6000 रुपयांमध्ये सहज मिळू शकतो. सेल्युलर रिपीटरचा अँटेना किमान 2 बार सिग्नल प्राप्त करणाऱ्या ठिकाणी ठेवा.

वायफाय कॉलिंगचा पर्याय

वायफाय कॉलिंग हा पर्याय तुम्ही तुमच्या होम वायफाय द्वारे वापरु शकता. या फीचरमुळे एकही रुपया खर्च न करता तुमचा प्रॉब्लम सॉल्व्ह होवू शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तो पर्याय चालू करावा लागेल.

सॉफ्टवेअर अपडेट

चांगल्या नेटवर्कसाठी फोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट असणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा कंपन्या अपडेटद्वारे नेटवर्कसह इतर गोष्टी अपडेट करीत असतात. फोन डेव्हलपर किरकोळ बग आणि बदलत्या टेक्नोलॉजीसाठी सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये सॉफ्टवेअर पॅच जोडत राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT