Merry Christmas 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Merry Christmas 2023: हॅपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हणतात? जाणून घ्या शब्दाचा अर्थ

ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात. ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना लोक हॅपी ऐवजी मेरी हा शब्द वापरतात हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Merry Christmas 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी 25 डिसेंबर हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जात आहे. ख्रिसमसचा सण वर्षाच्या शेवटी येतो म्हणून याला वर्षातील सर्वात मोठा शेवटचा सण असेही म्हणतात. भारतात तसेच अनेक देशांमध्ये ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा विश्वास आहे की हा दिवस ख्रिश्चन धर्मातील प्रभु येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात. ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना लोक हॅपी ऐवजी मेरी हा शब्द वापरतात हे जाणून घेऊया.

मेरी या शब्दाचा अर्थ काय आहे?

मेरी हा शब्द जर्मन आणि जुन्या इंग्रजी शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ देखील आनंदी असा होतो. 

हा शब्द कधी अस्तित्वात आला?

आता प्रश्न असा पडतो की हॅप्पी आणि मेरी या दोघांचा अर्थ जेव्हा आनंद होतो, तर मग ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण मेरी हा शब्द का वापरतो? याचे उत्तर असे की हा शब्द 16 व्या शतकात अस्तित्वात आला. त्यावेळी लोक फक्त इंग्रजी बोलायला शिकत होते. यानंतर 18 व्या आणि 19 व्या शतकात मेरी हा शब्द खूप लोकप्रिय झाला. 

आपण ते का वापरतो?

आता लोक ख्रिसमसच्या दिवशी हॅपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हणतात याबद्दल जाणून घेऊया. वास्तविक, प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी मेरी हा शब्द लोकप्रिय केला होता. त्यांनी त्यांच्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात मेरी हा शब्द खूप वापरला आहे. तेव्हापासून ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना लोकांनी हॅप्पी ऐवजी मेरी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. 

या ठिकाणी आजही हॅप्पी ख्रिसमस म्हटले जाते

जगभरातील लोक मेरी ख्रिसमस म्हणत असले तरी आजही इंग्लंडमध्ये लोक ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना हॅपी हा शब्द वापरतात.

दोन्ही शब्द बरोबर आहेत

मेरी आणि हॅप्पी या दोघांचा अर्थ एकच आहे यात शंका नाही. आपण शतकानुशतके मेरी ख्रिसमस म्हणत आलो आहोत ही वेगळी बाब आहे. त्यामुळे आता हॅपी ख्रिसमस म्हणणे विचित्र वाटू शकते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT