memory power Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Memory loss Causes: सारख्या गोष्टी विसरतायं? 'या' आजाराचे बळी असाल तर जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Memory Loss: तुम्हाला देखील छोट्या छोट्या गोष्टी आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहत नसेल तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हे चांगले लक्षण नाही. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

memory loss problem sign symptom of Alzheimer disease

आजकालच्या व्यस्त जीवनात ऑफिसमध्ये कामाचा ताण, तणाव किंवा चिंता यांमुळे अनेकजण गोष्टी विसरतात. परंतु, जर तुम्हाला लहान गोष्टी आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवता येत नसतील, तर तुम्ही वेळीच काळजी घेतली पाहिजे.

कारण हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले लक्षण नाही. काम करताना छोट्या-छोट्या गोष्टी विसरल्यास किंवा आपण काय करत आहोत हे विसरल्यास तुम्हाला अल्झायमरची समस्या असू शकते. यामुळे चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. पूर्वीच्या काळात ही समस्या वृद्धांमध्ये दिसून येत होती, परंतु आजकाल ही समस्या तरुणांमध्ये देखील दिसून येते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्झायमर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामुळे मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात. इतकेच नाही तर यामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते.

अल्झायमर रोग हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि यामध्ये मानवी मेंदू त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही. यामुळे रुग्णाला काही गोष्टी विसरणे सुरू होते. हे सामान्यतः मध्यम वयात किंवा वृद्धापकाळात मेंदूच्या ऊतींना झालेल्या नुकसानीमुळे होते असे मानले जाते. पण आता हा आजार तरुणांनाही जडत आहे.

लक्षणे कोणती

सोपी आणि साधी वाटणारी कामे पूर्ण करण्यात अडचणी येणे.

त्या समस्या पाहून सोडविण्यास असमर्थता वाटणे

निर्णय घेण्यात अडचण येणे

लक्षात ठेवणे कठिण जाणे.

संवाद साधताना अडचण निर्माण होणे

फोटो समजण्यात अडचणी येतात.

अल्झायमर कसा दूर करावा

अल्झायमरच्या समस्या दूर करण्यासाठी संगीताची खूप मदत होते,असे अनेक आरोग्यतज्ज्ञ सांगतात. कारण संगीत मेंदूला त्याच्या जुन्या गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करते. याशिवाय सकाळ-संध्याकाळ व्यायाम नक्कीच करावा. यासोबतच, निष्क्रिय बसू नका आणि स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. तसेच अल्झायमरचा त्रास असलेल्यांनी नशा करण्यापासून दूर राहावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT