Mayonnaise Side Effects: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mayonnaise Side Effects: मॅयोनेझ खाणे ठरु शकते आरोग्यासाठी घातक

चायनीज फूड असो किंवा पिझ्झा-बर्गर मॅयोनेझ खायला विसरत नाही.

दैनिक गोमन्तक

मेयोनिज हा पदार्थ प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. मग ती लहान मुले असो वा मोठे लोक असो आवडीने खातात. बर्गर, पिझ्झा किंवा मोमोज सोबत मेयोनिज नसेल तर चव येत नाही. काही लोक मेयोनिज सँडविच आणि पास्तामध्ये घालून सेवन करतात. तर काही लोकांना मेयोनिजचे क्रीमी टेक्सचर आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मेयोनीज आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही?

जर तुम्हीही मेयोनेझ (Mayonnaise) खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला त्याचे नुकसान देखील माहित असणे आवश्यक आहे. मेयोनेझचे अतिसेवन आरोग्याला (Health) अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांनाही बळी पडू शकता. चला तर मग जाणून घेऊया मेयोनेजचे अतिसेवन खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात.

मेयोनेझ खाण्याचे तोटे

  • मधुमेह

मेयोनेज जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्ही ते रोज खात असाल तर मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही ते खाणे टाळावे.

  • वजन वाढणे

मेयोनीज जास्त खाल्ल्याने तुमचे वजन (Weight) झपाट्याने वाढू शकते. खरं तर, मेयोनीज मध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यात चरबीही भरपूर असते. यामुळे मेयोनीज जास्त खाल्ल्यास लठ्ठ होण्याचा धोकाही वाढतो.

  • रक्तदाब वाढणे

मेयोनीज जास्त खाल्ल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. मेयोनेझमध्ये ओमेगा -6 फॅटी ऍसिडचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. मेयोनीजचे अतिसेवनाने हृदयविकाराचा झटका, हार्टस्टोक यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.

  • हृदयविकाराचा धोका

मेयोनीज प्रेमींसाठी धोका हा आहे की त्याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो. एक चमचे मेयोनीजमध्ये सुमारे 1.6 ग्रॅम संतृप्त चरबी असते. जास्त प्रमाणात मेयोनीज कोलेस्ट्रॉल वाढवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

  • डोकेदुखी आणि मळमळ

बाजारात उपलब्ध असलेल्या मेयोनीजमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम घटक वापरले जातात. यामध्ये असलेले एमएसजी आरोग्याला खूप हानी पोहोचवते. जास्त प्रमाणात मेयोनीज खाल्ल्याने अनेकांना डोकेदुखी,अशक्तपणा आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT