सुंदरतेला कॅमेरात कैद करणारी मयंका  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

सुंदरतेला कॅमेरात कैद करणारी मयंका

आपल्या दैनंदित आयुष्यातले सौंदर्य टिपण्याची सवय असेल तर ती छायाचित्रातही हमखास उतरते.

दैनिक गोमन्तक

ती व्यावसायिक छायाचित्रकार (Photographer) नाही तरीही छायाचित्रणाच्या कलेप्रती तिची उत्कटता एखाद्या व्यावसायिक कलाकारासारखीच आहे. मयंका हळर्णकर फोंड्याच्या सब-डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये फार्मा अधिकारी म्हणून काम करते. कामावर जाताना देखील कधीकधी ती आपला कॅमेरा (Camera) सोबतीला घेऊन जाते. येता-जाता वाटेवर कुठे एखादा विषय भेटला तर त्याला ती कॅमेऱ्यात टिपते. तिने टिपलेली पक्ष्यांची छायाचित्रे (Photo) पाहता मुळगांव, डिचोली इथल्या आपल्या घरापासून ते फोंड्याच्या हॉस्पिटलपर्यंत होणारा तिचा रोजचा प्रवास आनंदाचा असावा असेच वाटते. आपल्या दैनंदित आयुष्यातले सौंदर्य टिपण्याची सवय असेल तर ती छायाचित्रातही हमखास उतरते.

मयंका फार्मसी महाविद्यालयाची पदवीधारक. तिथे शिकताना ती आल्तिनोवरच्या हॉस्टेलमध्ये राहायची. त्याच काळात तिने आपल्या छायाचित्रेकारितेला सुरुवात केली. हॉस्टेलवरून कॉलेजमध्ये पायी जाताना अवतीभवती दिसणाऱ्या सुंदरतेला कॅमेऱ्यात कैद करण्याची तिची उर्मी तिला तिच्या या आवडत्या छंदाकडे घेऊन गेली. तेव्हापासून, म्हणजे २०१४ सालापासून ती आपल्या कॅमेऱ्यातून सौंदर्याचा वेध घेते आहे. रस्ते, गाव, निसर्ग, पक्षी हे तिचे आवडते विषय असतात.

आपल्या आवडत्या छंदाचे तांत्रिक ज्ञान आपल्याला व्यवस्थित व्हावे म्हणून मयंकाने छायाचित्रकारितेचे दोन लहान कोर्स देखील पूर्ण केले आहेत. त्यापैकी एक कोर्स चक्क सहा महिन्यांचा होता. दुसरा तीन महिन्यांचा होता. मयंकापाशी निकॉन D3500 कॅमेरा आणि ७०-३०० मिलिमीटरची लेन्स आहे. काही छायाचित्रांसाठी ती Z 50 वापरते. तिला हा आपला छंद अतिशय आवडतोच पण त्याबरोबर या छंदाने तिला जे काही दिले आहे तेही तिला फार अप्रूपाचे वाटते. ती म्हणते, एक छंद म्हणून तिने जेव्हापासून छायाचित्रकारिता निवडली तेव्हापासून तिला तिच्या वाट्याला अनेक चांगले अनुभव आले. अनेक लोकांना भेटायची संधी तिला लाभली. आपल्या संस्कृतीबद्दल या लोकांकडून तिला शिकता आले. त्यासाठी ती आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबर आपल्या छायाचित्रकारितेच्या छंदाचाही समान सन्मान करते.

कोरोनाकाळात मात्र ती आपल्या कामाच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये अतिशय व्यस्त राहिली. त्यामुळे गेले दीड वर्ष तिला आपल्या छंदाला वेळ देता आला नाही. मात्र आता स्थिती हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येते आहे. मयंका म्हणते, आता पुन्हा तिचे ‘विकेंडस’ छायाचित्रकारितेत गुंतले जातील. तसाही पक्षी गोव्यात येण्याचा मोसम जवळपास सुरू झालाच आहे. मयंकापाशी कॅमेरा आहेच. पक्षीही तिला भेटतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

SCROLL FOR NEXT