Marriage  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Marriage Tips: जर तुमच्या जोडीदाराला 'या' सवयी असतील, तर लग्न करण्यापूर्वी व्हा सावधान

Puja Bonkile

marriage tips if your partner has these bad habits then careful before getting marriage

आयुष्यात लग्नाचा निर्णय हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. तुम्ही मुलगा असो की मुलगी, दोघांनीही हा निर्णय हुशारीने घ्यावा. आपण एखाद्यावर प्रेम करतो किंवा कोणाकडे आकर्षित होतो हे पाहून केवळ त्या व्यक्तीशी लग्न करणे योग्य नाही. सर्वात पहिले त्याला योग्यरित्या ओळखणे महत्वाचे आहे. जर तुमच्या जोडीदाराला पुढील सवयी असतील तुम्ही लग्न करण्यापुर्वी एकदा नक्की विचार करावा.

जे म्हणतो ते करत नाही

तुमच्या जोडीदारालाही तो जे बोलतो ते न करण्याची सवय असेल तर सावध राहा. तुमचा जोडीदार वारंवार असे करत असेल तर अंतर ठेवण्यास सुरूवात करावी.

इतरांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे

वैवाहिक जीवनात एकमेकांच्या सवयी आणि करिअरचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या जोडीदाराने या सवयीकडे दुर्लक्ष केले आणि तुम्हाला तुमचे काम सोडण्यास सांगितले तर लग्नानंतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याआधी सावध राहणे आवश्यक आहे.

स्वतःबद्दलच बोलत राहणे

जर तुमच्या जोडीदारालाही फक्त स्वतःबद्दलच बोलायची सवय असेल आणि तुम्ही जे बोलता त्याला महत्त्व देत नसेल किंवा तुमचे लक्षपूर्वक ऐकत नसेल, तर याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण लग्नानंतर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लग्नानंतरही तो हे करू शकतो, त्यामुळे लग्न करण्यापूर्वी नक्की विचार करा.

खोटे बोलण्याची सवय

खोटे बोलल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. तुमच्या पार्टनरला खोटं बोलण्याची सवय असेल तर लग्न करतांना विचार करावा. जर तुमचा जोडीदार खोटारडा असेल तर, वेळेत स्वतःला दूर ठेवा आणि अशा व्यक्तीशी लग्न करण्यासाठी हो म्हणण्यापूर्वी विचार करा.

दिखावा करणे

तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा थोडा श्रीमंत आहे किंवा तुमच्यापेक्षा जास्त पैसा आहे असा दिखावा करत असेल तर वेळीच अंतर ठेवण्यास सुरूवात करा. जर तुमच्या जोडीदाराला दिखाऊपणाची सवय असेल तर याचा विचार करा. अन्यथा लग्नानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT