Marriage Rituals Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Marriage Rituals: ...म्हणून लग्नात वधू वर मेंहंदीच्या रंगात रंगून जातात

Marriage Rituals: भारतीय विवाहामध्ये मेहंदी काढण्याला एवढे महत्व का आहे हा जाणून घेऊया.

Puja Bonkile

Marriage Rituals: लग्न हा एक संस्कार आहे. यामध्ये अनेक विधी पार पाडल्या जातात. यामध्ये मेहंदी काढणे ही एक परंपरा आहे. लग्नाच्या आधी वर-वधुच्या हातावर सुंदर मेहंदी काढली जाते. ही विधी लग्नाच्या एक दिवस आधी वधू-वरांच्या घरी पार पडतो.

वेगवेगळ्या घराण्यातील वेगवेगळ्या चालीरीतींनुसार गाणी आणि नृत्याने ती पाडली जाते. वधूच्या हातावर लावल्या जाणाऱ्या मेहेंदीबद्दल एक खास गोष्ट आहे, ज्यामध्ये वराचे नाव अतिशय गुप्तपणे लिहिलेले असते.

जे वराला नंतर शोधावे लागते, हे दोघांमधील मौजमजेसाठी केले जाते. चला तर मग जाणून घेऊया याचा इतिहास आणि आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.

  • इतिहास

असे मानले जाते की 5,000 वर्षांपासून मेहंदीचा वापर हातावर आणि पायावर डिझाइन तयार करण्यासाठी केला जातो. काही विद्वान याला प्राचीन भारताची देणगी मानतात, तर काहींच्या मते ती मुघल आणि इजिप्शियन काळातील आहे.

पण भारतात मेहंदीला लग्नाचा एक महत्त्वाचा भाग बनवले असून त्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. अलिकडच्या काळात नवरीला मेहंदी लावतांना संगीत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

  • सौभाग्याचे प्रतिक

मेहंदी हे नशीब, वैवाहिक सुख, समृद्धी, प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की ते वधू आणि वरांचे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते आणि त्यांच्या नवीन जीवनात सकारात्मक उर्जा निर्माण करते. 

  • मेहंदीचा रंग पार्टनरचे प्रेम दर्शवतो

मेहंदी जोडपे आणि त्यांच्या कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी दर्शवते. वधुच्या हातावरची मेहंदी जास्त रंगली तर पतीसोबत नाते प्रेमळ असेल असे मानतात.

असे मानले जाते की मेहंदीचा रंग जितका जास्त काळ टिकतो तितकाच नवविवाहित जोडप्यासाठी अधिक शुभ असतो.

  • आरोग्यासाठी फायदेशीर

मेहंदी नैसर्गिकरित्या थंड असते. त्यामुळे हात आणि पायांवर लावल्याने स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. वधू-वरांना आराम वाटावा यासाठी लग्नादरम्यान मेहंदीही लावली जाते. तसेच थकवा दूर होतो.

  • प्रेम वाढते

मेहंदीच्या रंगात आणि सुगंधात कामोत्तेजक गुणधर्म असतात, जे लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांमध्ये जवळीक वाढवण्यास मदत करतात.

यासोबतच वधू-वरांना लावल्या जाणाऱ्या मेहंदीमध्ये लवंग आणि निलगिरीचे तेल यांसारखे घटक मिक्स केले जातात. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म दुर्गंधी आणि संसर्ग टाळण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT