Gold Cleaning Tips: सोन्याचे दागिने स्वच्छ करायचे असेल तर वापरा 'या' 5 सोप्या पद्धती

Tips For Cleaning Gold: तुम्ही घरगुती उपाय करून सोन्याचे दागिने स्वच्छ करू शकता.
Tips For Cleaning Gold
Tips For Cleaning GoldDainik Gomantak

Tips For Cleaning Gold: सोन्याचे दागिने अनेक महिला मोठ्या आवडीने घालतात. काही दिवसांनी सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी होऊ लागते. लोक जुन्या सोन्याच्या वस्तू विकून नवीन सोने खरेदी करतात. नाहीतर जुने सोने सोनाराकडे नेऊन स्वच्छ करून घेतात.

अनेक सोनार सोने काढून फसवणूक करतात. त्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांना चमक देऊ शकता. 

  • अमोनिया

अमोनिया सोन्याला पॉलिश करण्यास मदत करते. पाण्यात थोडे अमोनिया मिसळा आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. काही मिनिटांनंतर, ते बाहेर काढा आणि कोरडे करा. 

  • बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

अर्धा कप व्हिनेगर आणि दोन चमचे बेकिंग सोडा एका भांड्यात मिक्स करा. नंतर तुमचे सोन्याचे दागिने या मिश्रणात 2-3 तास ​​बुडवून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवावे आणि मऊ कापडाने पुसून घ्यावे. तुमचे सोन्याचे दागिने पुन्हा नव्यासारखे चमकतील.

Tips For Cleaning Gold
Aloe Vera Gel: मजबुत अन् घनदाट केसांसाठी असा करा कोरफडचे जेलचा वापर
  • साबणाचे पाणी

एका भांड्यात कोमट पाणी आणि शॅम्पू किंवा साबणाचे काही थेंब मिसळा, त्यानंतर दागिने त्यात बुडवा आणि ब्रशने हळूवारपणे स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने धुवा आणि नंतर मऊ कापडाने स्वच्छ पुसुन घ्यावे. 

  • टूथपेस्ट

सोन्याला पॉलिश करण्यासाठी टूथपेस्टही उपयुक्त ठरते. दागिन्यांवर टूथपेस्ट लावा आणि ब्रशने हळूवारपणे स्वच्छ करा. नंतर ते पाण्याने चांगले धुवा. त्यानंतर सोन्यात नवी चमक पाहायला मिळेल. 

  • सोडा आणि मीठ

एका भांड्यात गरम पाणी, एक चमचा बारीक सोडा आणि अर्धा चमचा मीठ घालून सोडा आणि मीठ यांचे मिश्रण तयार करा . त्यात दागिने 10 मिनिटे भिजवा. नंतर ते धुवून कोरडे करा. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com