Rice Crispy Vada Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तांदळाच्या पिठापासून बनवा कुरकुरीत वडे, पावसात हिरव्या चटणीसोबत घ्या आस्वाद

तांदळापासून बनवलेले हे वडे अतिशय कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम लागतात.

दैनिक गोमन्तक

Rice Crispy Vada Recipe: कधी भूक लागेल हे सांगणे जरा अवघडच आहे. एनवेळी भूक लागली तर काय करून खाव हा पहिला प्रश्न पडतो. तेव्हा त्वरीत काय करून खाता येईल याचा शोध सुरू होतो. विशेषतः सोप्या आणि झटपट पाककृती मुलांची भूक भागवण्यासाठी जास्त सोयीस्कर असतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्यासाठी तांदळाचे वडे बनवू शकता. तांदळापासून बनवलेले हे वडे अतिशय कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम लागतात. ते हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह केले जाऊ शकतात. आणि ते बनवण्याची रेसिपी देखील खूप सोप्पी आहे.

वडा बनवण्यासाठी साहित्य

हे वडे बनवण्यासाठी तुम्हाला जिरे, चिली फ्लेक्स, हिरवी धणे, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ, उकडलेले बटाटे, पाणी, मीठ, तेल लागेल. याशिवाय हिरवी चटणी बनवण्यासाठी हिरवी धने, हिरवी मिरची, दही, जिरे, काळे मीठ, मीठ, आंबट आवश्यक आहे.

कृती

तांदळाचे वडे बनवण्यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात जिरे, चिली फ्लेक्स, हिरवी धणे, हिरवी मिरची, मीठ, तेल टाका. नंतर त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करावे. मिक्स केल्यानंतर, उकडलेले बटाटे मॅश करा आणि त्यात घाला. नीट ढवळून घ्यावे आणि नंतर गॅस बंद करून, झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे स्टिम होवू द्या.

आता हे मिश्रण पिठासारखे मळून घ्या. हाताला तेल लावा आणि थोडासा गोळा घेवून त्याला वड्याचा आकार द्या. सर्व वडे करून झाल्यावर कढईत तेल गरम करून लालसर होईपर्यंत तळून घ्या. वडे तळून झाल्यावर चटणीबरोबर सर्व्ह करा.

चटणी कशी बनवायची

हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या. नंतर दोन्ही गोष्टी ब्लेंडरमध्ये टाकून त्यात दही, जिरे, काळे मीठ, मीठ, आंबट मलई घालून चांगले एकजीव करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT