Lung Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, ज्यात काही जणांचे वय तर 30 वर्षांपेक्षाही कमी आहे.

Manish Jadhav

फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) हा आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एका नवीन अहवालानुसार, भारतात आता 50 वर्षांखालील लोकही मोठ्या संख्येने या गंभीर आजाराला बळी पडत आहेत. लंग कॅन्सर फाऊंडेशन ऑफ इंडियाने (Lung Cancer Foundation of India) केलेल्या अभ्यासात असे समोर आले की, सुमारे 21 टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, ज्यात काही जणांचे वय तर 30 वर्षांपेक्षाही कमी आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक आहे, कारण यापूर्वी हा आजार वृद्धांचा मानला जात होता.

फुफ्फुसांचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, परंतु जर वेळेत त्याची लक्षणे ओळखली गेली आणि जीवनशैलीत सुधारणा केली गेली, तर यापासून बऱ्याच अंशी बचाव करता येतो. विशेषतः तरुणांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा आजार आता वय बघून होत नाहीये. स्वच्छ हवा, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच फुफ्फुसांना सुरक्षित ठेवू शकतात.

फुफ्फुसांचा कर्करोग वाढवणारे धोक्याचे घटक

या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमागे सर्वात मोठे कारण वायुप्रदूषण (Air Pollution) सांगितले जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील 91 टक्के लोकसंख्या अशा भागात राहते जिथे हवा डब्ल्यूएचओच्या निर्धारित मानकांपेक्षाही जास्त खराब आहे. या दूषित हवेत असलेले पीएम 2.5 (PM 2.5) सारखे सूक्ष्म कण थेट आपल्या फुफ्फुसात जाऊन त्यांना नुकसान पोहोचवतात. हे कण पॉवर प्लांट, वाहनांचा धूर, इंडस्ट्रीज, कचरा जाळणे यांसारख्या गोष्टींमधून बाहेर पडतात. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही 20 मिलीग्राम पीएम 2.5 असलेल्या क्षेत्रात श्वास घेत असाल, तर त्याचा परिणाम एक सिगारेट (Cigarette) पिण्याइतका असतो. आणि जर ही मात्रा 200 मिलीग्राम असेल, तर 10 सिगारेट इतके नुकसान होते.

धूर आणि पॅसिव्ह स्मोकिंगचा धोका

प्रदूषणाव्यतिरिक्त धूम्रपान (Smoking), पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) (म्हणजे इतरांच्या सिगारेटच्या धुराचा परिणाम), लाकूड किंवा कोळशावर स्वयंपाक करणे, रसायनांच्या संपर्कात येणे (Exposure to Chemicals) आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती (Weak Immunity) देखील या आजाराची कारणे आहेत. विशेषतः शहरांमध्ये, जिथे वायुप्रदूषणाची पातळी खूप जास्त असते, तिथे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

धूम्रपान न करणाऱ्या लोकांना वाटते की, त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकत नाही, पण तसे नाही. पॅसिव्ह स्मोकिंग देखील तितकीच धोकादायक असते. सिगारेटचा धूर जेव्हा जवळ बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातो, तेव्हा त्याच्या फुफ्फुसांवरही परिणाम होतो. हे मुलांसाठी (Children) आणखी जास्त नुकसानदायक असते, कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा मुलांना अस्थमा (Asthma), न्यूमोनिया (Pneumonia), खोकला (Cough) आणि अगदी फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरुवातीचे लक्षणे

सतत खोकला लागणे

खोकताना रक्त येणे

आवाजात बदल किंवा जडपणा जाणवणे

श्वास फुलणे

थकवा जाणवणे आणि प्रयत्न न करता वजन कमी होणे

फुफ्फुसाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाय

फुफ्फुसांच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणात (Environment) आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. सर्वात आधी धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे सोडून द्यावे. जर घरात कोणी धूम्रपान करत असेल, तर मुलांना त्यापासून दूर ठेवावे. आहारात ताजी फळे (Fresh Fruits) आणि हिरव्या भाज्यांचा (Green Vegetables) समावेश करावा, जेणेकरुन रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. नियमितपणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करा आणि प्रदूषित भागात बाहेर पडताना मास्क किंवा स्कार्फचा वापर करा. घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे देखील फायदेशीर ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT