Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: ऑफिसमध्ये काम करतांना 'ही' चूक करत असाल तर वेळीच व्हा सावध

ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

निरोगी आरोग्यासाठी शरीराची हालचाल होत राहणे फार गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीराची हालचाल होते आणि निरोगी राहण्यास मदत होते. पण अनेक लोक ऑफिसमध्ये दिवसभर बसूनच काम करतात. अशा लोकांची हालचाल कमी होते.

पण बसून काम केल्याने अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. अलिकडेच झालेल्या संशोधनात असे दिसून आले की एकाजागी जास्त वेळ बसून काम केल्याने लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

एकाच ठिकाणी बसून काम केल्याने जास्त एनर्जी खर्च होत नाही. जर आपण एनर्जीचा वापर केला नाही तर अनेक शारिरीक आजारांचा धोका वाढू शकतो. एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीस यासारखे अनेक आजार निर्माण होउ शकतात. तसेच हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका अधिक असतो.

कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, जे लोक ऑफिसमध्ये (Office) एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. जे लोक आठ तासांहून अधिक वेळ बसून काम करतात त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, अशी माहिती चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासात दिली आहे.

  • एकाच जागी बसून काम करत असाल तर कोणती काळजी घ्यावी

एकाच जागेवरच बसून काम असाल तर अधूनमधून थोडा ब्रेक घ्यावा.

दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

अधून मधून चालावे.

थोडावेळ मानेचा व्यायम करावा

लिफ्ट एवजी पायऱ्यांचा वापर करावा.

नाहीतर त्यांना या आजारांचा सामोरं जावू लागू शकतं.

त्यामुळे वेळीच सतर्क व्हावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मधुमेह आणि हृदयविकारासंबंधित अनेक गंभीर आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांना वेळोवेळी शरीराची हालचाल करण्यासाठी चालणाऱ्या लोकांना सतत बसून राहणाऱ्यांच्या तुलनेने आजारांचा धोका कमी होतो.

तसेच कमी शारीरिक हालचालीमुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो, असंही शास्त्रज्ञांचे मत आहे. सतत बसण्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी तुम्ही योगासने करू शकता.

वेळोवेळी शरीराची हालचाल केल्याने शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही (Mental Health) चांगला परिणाम होतो. संशोधनात आढळले की, दिवसभर बसून काम करण्याऐवजी दर अर्ध्या तासाला पाच मिनिटे चालल्याने व्यक्तींना कमी थकवा जाणवत होता.

त्याचा मूडही (Mood) चांगला होता. चालण्यामुळे त्यांना अधिक ऊर्जा मिळाली. या संशोधनाच्या अहवालानुसार दर तासाला थोडे चालणे यामुळे मूड सुधारू शकतो. थकवाही कमी होतो आणि रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते, हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT