Lemon Water Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lemon Water: लिंबूपाणी पिताना तुम्हीही 'हीच' चूक करताय का? मग फायद्याऐवजी होईल नुकसान

लिंबू पाणी हा आरोग्याचा उत्तम साथीदार आहे

Kavya Powar

Lemon Water Side Effects: लिंबू पाणी हा आरोग्याचा उत्तम साथीदार आहे. हे एक आरोग्यदायी पेय मानले जाते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

दुसरीकडे, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल. सर्दी, फ्लू आणि व्हायरल आजारांपासून तुमचे नेहमीच संरक्षण होईल. लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे कामही करते.

त्यामुळे व्यक्ती निरोगी राहते आणि वजनही व्यवस्थित राहते. लिंबू पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण अनेकदा लिंबूपाणी पिताना किंवा बनवताना आपण काही चुका करतो. लिंबूपाणी पिताना आणि बनवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घ्या

लिंबूपाणी बनवताना या चुका करू नका:

प्रमाणापेक्षा जास्त लिंबू घालू नका

काही लोक सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करतात. जेणेकरुन शरीरातील चयापचय गती खूप जास्त राहते. पण नेहमी लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यात जास्त लिंबू घालू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

ऍसिडिटी होऊ शकते

एकापेक्षा जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळे दिवसातून एकदाच लिंबू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यापेक्षा जास्त तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

थंड पाण्यात लिंबूपाणी बनवणे

काही लोक फ्रीजमधून पाणी काढतात आणि त्यातून लिंबूपाणी बनवतात. पण यामुळे तुम्हाला लिंबाचे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे फक्त साध्या पाण्यात लिंबू टाकून पिण्याचा प्रयत्न करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Carambolim: 'गरीब अडचणीत येतील, गावाचा विनाश होईल'! करमळीत ‘मेगा प्रोजेक्ट’ला विरोध; ग्रामसभेत ठराव

Cyber Crime: ऑनलाईन गंडा; गोवेकरांचे 73 लाख पाण्‍यात! आर्थिक फसवणुकीच्‍या 903 घटना घडल्‍या

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

SCROLL FOR NEXT