मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये पोट दुखी, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मूड बदलणे, वजन वाढण्यासोबतच चिडचिडपणा वाढणे यासारख्या समस्या वधू शकतात. मासिक पाळीच्या दरम्यान वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे, जे पाळी संपल्यावर स्वत:हून कमी होते,असे का होते हे जाणून घेऊया.
* वॉटर रिटेन्शन
मासिक पाळीमध्ये महिलांच्या प्रजनन हार्मोन्सची पातळी वाढते. याकाळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे पाणी टिकून राहते म्हणजेच शरीराच्या अवयवामध्ये पाणी साचते. त्यामुळे शरीरात साठलेल्या पाण्यामुळे वजन वाढते. पण मासिक पाळीनंतर वजन कमी होते.
* हार्मोन्स
मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे अधिक वाढते, त्यामुळे थोडेसे अन्नही शरीरात द्रवपदार्थ टिकून ठेवू शकते. त्यामुळे महिलांनाही फुगल्यासारखे वाटते. अशा वेळी शरीरात प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे पाणी टिकून राहते आणि अचानक वजन वाढते.
* अधिक भूक लागणे
शरीरात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांना अधिक भूक लागते. यामुळे त्याना या काळात अधिक चवदार पदार्थ खावेसे वाटतात. तसेच या दिवसांमध्ये शारीरिक हालचाल कमी असल्याने वजन वाढू शकते.
* कॅफिनचे सेवन
मासिक पाळीमध्ये हार्मोन्समध्ये (Hormones) बदल होतात, यामुळे महिलांमध्ये कॅफिनचे सेवन वाढते. यामुळे महिलांमध्ये थकवा आणि वेदांपासून आराम मिळवण्यासाठी कॉफीचे (Coffee) अधिक सेवन करतात. अतिरिक्त कॅफीन शरीरात गेल्याने सूज येते. यामुळे वजन वाढू शकते.
* योगाचा अभाव
मासिक पाळीमध्ये थकवा आल्यामुळे जीममध्ये जाणे किंवा योगा (Yoga) करणे शक्य होत नाही. या काळात अति खाणे आणि पिणे साठवून ठेवल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होत नाही यामुळे महिलांचे वजन (Weight) वाढू शकते.
* पचनाच्या समस्या
मासिक पाळीदरम्यान (Menstrual) महिलांना (Women) पोटदुखी आणि पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे याकाळात अन्न पचनाच्या समस्या निर्माण होतात. शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे असे होऊ शकते. यामुळे विविध प्रकारचे पदार्थ खाल्याने पोट फुगळ्यासारखे होते. याकाळात महिलांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी (Acidity) यासारख्या समस्या उद्भवतात आणि वजन वाढते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.