आवळा हे फळ निरोगी आरोग्य आणि दीर्घा आयुष्य लाभण्यासाठी उपयुक्त  Danik Gomanatk
लाइफस्टाइल

आवळा रसाचे जाणून घ्या जबरदस्त फायदे -

आवळ्याचा रस (Amla Juice) प्यायल्याने शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

दैनिक गोमन्तक

Amla Juice : आवळा (Amla) हे फळ निरोगी आरोग्य आणि दीर्घा आयुष्य लाभण्यासाठी उपयुक्त आहे. यात 'क' जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्व दिले जाते. हिंदीमध्ये आवला , संस्कृतमध्ये आमलकी अशी नवे आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. नियमितपणे आवळा रस (Amla Juice) प्यायलास तुमच्या त्वचेला (Skin) अनेक फायदे होतात. उत्तर आणि दक्षिण भारतात उत्पादन घेतल जाते. आवळ्यात पांढरे आणि'रान आवळे (Amla) असे दोन मुख्य प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा खुप गुणकारी असतो. आवळ्याचा मुरंबा, चटणी, सरबत , सुपारी करून वर्षभर आवळ्याचे सेवन करता येते. आज जाणून घेऊया आवळा रस प्यायल्याचे फायदे.

1) दांत मजबूत होतात -

नियमित आवळा रस प्यायल्याने दात मजबूत होतात. या रसात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. आवळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच सांधेदुखी कमी होते.

2) केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त -

या रसामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते. केस सील्की होऊन लांब आणि काळे होतात. आवळ्याचे सेवन केसांसाठी खूप गुणकारी आहे. यामुळे केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.

3) त्वचा चमकादर होते -

ऑक्सिडंट्स या घटकामुळे चेहऱ्यावरील वाढत्या वयाचे परिणाम दिसून येत नाही. तसेच या रसात मध मिक्स केल्यास चेहरा चमकदार होण्यास मदत मिळते.

4) त्वचेची जळजळ कमी होते -

त्वचेमध्ये काही घटकांची कमतरता असल्यास जळजळ होते. यावर आवळा रस प्यायल्यास त्वचेची सूज कमी होते. कारण यामध्ये 'एंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

5) डोळ्यास उपयुक्त -

आवला रस डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. नियमित आवला रस प्यायल्याने नजर चांगली होते. तसेच तोंडात फोड आल्यास आवळचा रस घेतल्याने तोंडातील फोड कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT