Knuckle Cracking Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Knuckle Cracking: बोटं मोडल्यावर आवाज का येतो? घ्या जाणून

Knuckle Cracking: लहानपणापासून घरातली मोठी माणसं बोटं मोडायची नाहीत, असं सांगत असतात.

दैनिक गोमन्तक

Knuckle Cracking: तुम्ही आपल्या आसपास बोटं मोडण्याची सवय असणाऱ्या अनेक लोकांना पाहिले असेल. बोटं मोडल्यामुळे त्या व्यक्तींना रिलॅक्स वाटते. काही लोकं अशी असतात, ज्यांना बोटं मोडण्याचा आवाज खूप आवडतो. तो आवाज ऐकण्यासाठी ते व्यक्ती वारंवार बोटं मोडतात. पण लहानपणापासून घरातली मोठी माणसं बोटं मोडायची नाहीत, असं सांगत असतात. त्यामागे फार मोठे कारण आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत.

व्यक्ती एकटा असताना किंवा घाबरल्यावर बोटं मोडत बसतो. लहान मुलं मोठ्यांना बोटं मोडताना पाहून तसचं करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांच्या मते, बोटं मोडण्याच्या सवयीमुळे अर्थराइटिसचा त्रास होतो.

Knuckle Cracking

तसेच, बोटं मोडल्यावर आवाज का येतो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दल सांगायचे झाल्यास, आपल्या शरीरात एक द्रव्य आढळुन येते. ज्यामध्ये हवा भरलेली असते. बोटं मोडल्यावर ती हवा रिलीज होते. बोटं मोडल्यानंतर स्नायुंना आराम मिळतो.

बोटं मोडल्यावर अर्थराइटिसचा त्रास होतो, असं काही लोकांना वाटतं पण त्यामध्ये तथ्य नाही. याविषयी डोनाल्ड हंगर या संशोधकाने 60 वर्ष संशोधन केले. एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी एका हाताची बोटं वारंवार मोडली. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, अर्थराइटिसचा त्रास आणि बोट मोडण्याची सवय या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

बोटं मोडल्यावर स्नायुंना आराम मिळतो पण सारखं तेच केलं तर स्नायू दुखायला सुरुवात होते. त्यामुळे बोटं मोडण्याची सवयी लागणे घातक ठरु शकते. तसेच बोटं मोडण्याचा आवाज तुम्हाला आवडत असेल तरी शरीरासाठी ती सवय अपायकारक असल्यामुळे सतत बोटं मोडणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT