Apricot Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Apricot Health Benefits : जर्दाळूचे हे फायदे शरीरसाठी आहेत गुणकारी; जाणून घ्या

जर्दाळू आकाराने लहान असतात. परंतु हे आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

दैनिक गोमन्तक

जर्दाळू आकाराने लहान असतात. परंतु हे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. यात जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असून याची चव गोड-आंबट असते. जर्दाळू खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक आहे. जर्दाळूमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे निरोगी आरोग्य ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, अपचन आणि त्वचेचे विकार यांसारख्या आजारांपासून बचाव करतात. जर्दाळूचे काही आरोग्यदायी फायदे आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. (Apricot Health Benefits)

जर्दाळूचे 5 आश्चर्यकारक फायदे

  • निरोगी त्वचा

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे मिश्रण समाविष्ट असते. यामुळे त्वचेसंबंधित आजार दूर राहतात. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे दररोज 1 ते 2 जर्दाळू खाण्यास विसरू नका. जर्दाळू सारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध पौष्टिक आहार त्वचेला होणारे नुकसान बरे करण्यास मदत करू शकतो.

  • हृदयासाठी चांगले

उच्च कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जर्दाळूमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करते. जर्दाळूमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असतात, हे सर्व मुक्त रॅडिकल्सशी लढा देऊन आणि रक्तदाब कमी करून निरोगी हृदयाला मदत करण्यासाठी एकत्र काम करतात

  • कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित

जर्दाळूच्या एका वाटीत अंदाजे 3 ग्रॅम फायबर असते. तुमच्याकडे ते पुरेसे नसल्यास, तुमच्या पचनसंस्थेला अधिक चांगले कार्य करण्यास मदत करण्यासाठी जर्दाळू लाभदायी ठरते. जर्दाळूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फायबर तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

  • बद्धकोष्ठतेचि समस्या कमी

जर्दाळूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. सेल्युलोज आणि पेक्टिनचे रेचक गुण देखील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. वाळलेल्या आणि ताज्या जर्दाळू दोन्हीमध्ये फायबरचा समावेश होतो, जर्दाळूमधील विरघळणारे फायबर शरीरात त्वरीत विरघळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly Live Updates: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT