Kiwi Hair Pack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kiwi Hair Pack: केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक

किवी (Kiwi) हे फळ केसांच्या आरोग्यासाठी (Hair Health) लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल चिकूसारखे ब्राऊन रंगाचे फळ बाजारात विकले जाते. ते डेंग्यूसारख्या (Dengue)अनेक आजारांवर (Disease) उपयुक्त आहे. हे फळ बाहेरून तपकिरी आणि आतून हिरवे असते या फळाला किवी (Kiwi) म्हणतात. हे फळ चवीनुसार आंबट-गोड असून पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फोलेट, फायबर, सोडियम, कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. किवी आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने केसांना (Hair)पोषण मिळते. तसेच केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी मदत करते. चला तर मग जाणून घेवूया किवीपासून हेयर पॅक (Hair pack ) कसे तयार करायचे.

* मऊ केसांसाठी

किवी हे फळ केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी असते. यामधील पोषक घटकांमुळे केसांना नैसर्गिकरीत्या मऊ ठेवते. किवीमधील जीवनसत्वामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यामुळे किवीचे हेयर पॅक लावल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.

* कसा करावा वापर

किवीचे हेयर पॅक तयार करण्यासाठी 2 पिकलेले किवी घ्यावे. नंतर त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. हि पेस्ट केसांच्या मुळात लावावी. 25 ते 30 मिनीटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे.

* किवी हेयर मास्कचे फायदे

* केस गळणे थांबतात

लांब आणि घनदाट केसांसाठी तुम्ही किवीचे हेयर मास्क वापरू शकता. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असते. यामुळे केसांचे गळणे कमी होण्यास मदत मिळते.

* कसा करावा वापर

किवी हेयर पॅकचा वापर करतांना दोन पिकलेल्या किवीमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा कांद्याचा रस मिक्स करावे. याचे मिश्रण चांगले एकजीवकरून घ्यावे. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळात लावून हलक्या हाताने मसाज करावी. 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते.

* केस तुटणे थांबतात

किवी हेयर पॅकचा वापर केल्याने केसं तुटणे थांबतात. यासाठी तुम्हाला किवी आणि नारळाचे तेल घ्यावे.

* किवी व नारळाच्या तेलाचे हेयर पॅक

हे हेयर पॅक तयार करतांना 1 चमचा किवीचा गर काढावा आणि 1 चमचा नारळाचे तेल चांगले मिक्स करावे. हे मिश्रण केसांच्या मुळात लावावे. 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी. एक ते दोन तासानंतर केस शॅम्पू करून स्वच्छ धुवावे. यामुळे केस मऊ आणि जाड होण्यास मदत मिळते. हे हेयर पॅक आठवड्यातून एकदा नक्की लावावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT