आजकाल सर्वांच्या घरात कोरफड वनस्पती (Aloe Vera Plant) असतेच. कोरफड आपल्या शरीर (Health) आणि त्वचेसाठी (Skin) फायदेशीर आहे. कोरफड हे त्वचेची काळजी, केसांचे सौंदर्य, जखमा बरे करणे आणि कर्करोगाच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए, सी आणि ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक आम्ल कोरफडमध्ये मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय कोरफडमध्ये अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेतील (Skin) ओलावा टिकुन राहण्यास मदत मिळते .
* घरगुती एलोवेरा जेल बनवण्याची पद्धत
* एलोवेराचे एक मोठे पान घ्यावे.
* या पानाला दोन्ही बाजूने चाकूने कापून घ्यावे. नंतर त्या पानाचे दोन भाग करावे.
* चमच्याच्या मदतीने संपूर्ण कोरफड जेल काढून घेऊन एका भांड्यात ठेवावा.
* तुम्हाला जर एलोवेराचा गर मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा असेल तर आधी मिक्सरच्या भांडे स्वच्छ करून घ्यावे.
* मिक्सरमध्ये चांगली पेस्ट तयार घ्यावी.
* हि पेस्ट तुम्ही लगेच केसांमध्ये किंवा त्वचेला लावू शकता.
* घरी बनवलेल्या एलोवेरा जेलला एका हवा बंद काचेच्या भरणीत ठेवू शकता.
* तुम्हाला जर एलोवेरा जेल अधिक काळासाठी साठवून ठेवावयाचे असेल तर त्यात व्हिटॅमिन सी आणि कॅप्सूल ई टाकावी.
* व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' मध्ये अँटिऑक्सिडेंट आणि एंटी-एजिंग गुणधर्म असतात.
* ऐलोवेरा जेलचे फायदे
* ऐलोवेरा जेल
रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून ऐलोवेरा जेल लावावे. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि मुरुमाचे डाग कमी होण्यास मदत मिळते.
* ऐलोवेरा फेस स्क्रब
एलोवेरा जेलमध्ये १ चमचा ओट्स मिकी करावे. याचे जाडसर मिश्रण तयार करावे. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे आठवड्यातून दोन दिवस केल्याने चेहरा चमकदार दिसतो.
* ऐलोवेरा हेअर मास्क
एलोवेरा जेलमुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. एलोवेरा जेल केसांना लावल्यामुळे केसातील कोंड्याचे प्रमाण कमी होते. तसेच केसांचे गळणे देखील कमी होते. ऐलोवेरा हेअर मास्क तयार करण्यासाठी नारळ तेल अर्धा काप घ्यावे. त्यात २ चमचे ऐलोवेरा जेल मिक्स करावे. याचे एकजीव मिश्रण तयार करून घ्यावे. नंतर केसांच्या मुळात हे मिश्रण लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुणं घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.