Kitchen tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Tips: चिंता नको! केवळ 8 रूपयांमध्ये स्वच्छ होईल किचनमधील चिमणी

तुमच्याही किचनमध्ये जर चिमणी असेल तर या टिप्स वापरून स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Tips: प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिक चिमणी ही असतेच. चिमणीशिवाय स्वयंपाकघरात काम करणे कठीण आहे. कारण, स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर आणि वाफ चिमणीतून बाहेर पडतो.

त्यामुळे स्वयंपाकघरात गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण होत नाही. म्हणूनच आता स्वयंपाकघरात चिमणी असणे सामान्य झाले आहे. परंतु, चिमणीच्या देखभालीबाबत अजूनही अनेकांना माहिती नाही, त्यामुळे अनेकदा गॅस शेगडीच्या वरच्या चिमणीतून तेल टपकत असते. 

तुम्ही फक्त 8 रुपयांमध्ये तुमची चिमणी स्वच्छ करू शकता. तसेच, या टिप्सचा वापर करून, तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत आणि 15 मिनिटांत तुमची चिमणी पूर्वीसारखी स्वच्छ होईल.

  • घरातील चिमणी कधी साफ करावी

चिमणी 2-3 महिन्यातून एकदा तरी स्वच्छ करावी. परंतु, जर तुम्ही जास्त तेल आणि मसाल्यांनी अन्न शिजवले तर ते महिन्यातून एकदा नक्कीच स्वच्छ करावी. याशिवाय, चिमणीची स्वच्छता देखील त्याच्या फिल्टरवर अवलंबून असते. कॅसेट फिल्टरच्या बाबतीत, ते दर 8-10 दिवसांनी स्वच्छ केले पाहिजे. तर, बाफल फिल्टर 2-4 आठवड्यातून एकदा साफ करणे आवश्यक आहे आणि चारकोल फिल्टर 3-6 महिन्यांत एकदा बदलणे आवश्यक आहे.

  • किचनची चिमणी व्हिनेगरने साफ करा

तुमच्या स्वयंपाकघरात व्हिनेगर असेल तर तुम्हाला किचनची चिमणी स्वच्छ ठेवणे खूप सोपे जाईल. यासाठी, फिल्टर काळजीपूर्वक बाहेर काढा आणि व्हिनेगर मिसळलेल्या गरम उकळत्या पाण्यात बुडवावे. यासाठी फक्त १-२ कप व्हिनेगर वापरावे. फिल्टर 15 मिनिटे भिजल्यावर, मऊ स्क्रबरने एक एक करून स्वच्छ करा. यानंतर ते कोरडे करा आणि पुन्हा चिमणीत ठेवा.

  • बेकिंग सोड्याने चिमणी करा स्वच्छ

बेकिंग सोडा स्वयंपाकासोबत साफसफाईसाठीही खूप प्रभावी मानला जातो. याचा वापर करून चिमणीही उजळली जाऊ शकते. बेकिंग सोड्याने चिमणी स्वच्छ करण्यासाठी, त्याची पेस्ट एका भांड्यात तयार करावी. नंतर चिमणी कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि मऊ ब्रशच्या मदतीने संपूर्ण चिमणीवर चांगले लावा आणि 5-10 मिनिटे सोडा. आता ते ओल्या कापडाने पुसून टाका. किचनमधील चिमणी स्वच्छ दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT