Use these tips to store coffee powder for a long time Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: दिर्घकाळासाठी कॉफी पावडर अशी करा स्टोअर

वातावरणातील बदलामुळे कॉफी पावडर (Coffee powder) खराब होते.

दैनिक गोमन्तक

पावसाळा (Rainy days) म्हटलं की, चहा (Tea) आणि कॉफी (Coffee) हे ठरलेले पेय. बाहेर पाऊस पडत असेल तर प्रत्येकालाच चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होत असते. चहापेक्षा काहींना कॉफी जास्त आवडते. मात्र काहीवेळा वातावरणातील बदलामुळे किंवा व्यवस्थित स्टोअर (Store) करुन न ठेवल्यामुळे कॉफी पावडर (Coffee powder) खराब होते आणि आपला संपुर्ण मुड खराब होतो. पण काही सोप्या टिप्स (Tips)फॉलो केल्या तर पावसाळ्यात कॉफी पावडर खराब होणार नाही.

* कॉफी पावडर स्टोअर करण्याच्या काही सिंपल टिप्स

* कॉफी पावडरला फ्रीजमध्ये ठेवल्याने पावडर खराब होणार नाही. तसेच तुम्ही कॉफी पावडर फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता. यामुळे अनेक महीने कॉफी पावडर खराब होणार नाही. परंतु फ्रीजमध्ये ठेवतांना एक काळजी घ्यावी ती म्हणजे कॉफी पावडर ज्या बॉक्समध्ये ठेवत असला तो हवा बंद असावा.

* कॉफी पावडर खराब होऊ नये म्हणून तुम्ही हवा बंद डब्ब्यात ठेवू शकता. परंतु कॉफी पावडर ठेवण्याआधी डब्ब्यात काही तांदळाचे दाणे टाकावे. यामुळे कॉफी पावडरची टेस्ट खराब होणार नाही. तसेच दीर्घकाळपर्यंत कॉफी पावडर टिकून राहते.

अनेकवेळा असे होते की, आपण काचेच्या डब्ब्यात कॉफी पावडर (Coffee powder) ठेवतो. परंतु त्यात देखील कॉफी पावडर (Coffee powder) कडक होण्याची शक्यता असते. यामुळे काचेच्या डब्ब्यातुन कॉफी पावडर काढून घेवुन ती स्वच्छ करावी. स्वच्छ झाल्यानंतर त्यात एक टिश्यू पेपर (Tissue paper) टाकावा. नंतर त्यात एक चमचा चहा पावडर टाकून यात कॉफी पावडर भरावी. ही ट्रिक वापरल्याने कॉफी पावडर कडक होणार नाही.

* काही खास टिप्स

* जर तुम्ही कॉफी पावडर (Coffee) फ्रीजमध्ये ठेवायची नसेल तर कॉफी पावडरला एका डब्ब्यात प्लॅस्टिकने घट्ट बांधून ठेवावे.

* कॉफी पावडरच्या (Coffee) डब्ब्यात चमचा ठेवणे टाळावे .

* कॉफी पावडर (Coffee) काढण्यासाठी स्वच्छ आणि लाकडी चमच्याचा वापर करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: आलेक्स सिक्वेरांचे नोकरी विक्री माफियांना संरक्षण, पणजीकरांचा हल्लाबोल

Vishwajit Rane: 'बनावट कागदपत्रे' तयार करणे हा फौजदारी गुन्हा! मंत्री राणेंनी दिले तक्रार नोंदविण्याचे निर्देश

'Cash For Job' घोटाळ्यातील सर्वांचेच राजकारण्यांशी संबंध! 'प्रियोळ कनेक्शन'ची जोरदार चर्चा; मध्यस्थांना पळताभुई थोडी

Rashi Bhavishya 10 November 2024: धनाची प्राप्ती होईल, तरीही अनावश्यक खर्च टाळा जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Professional League 2024: 'धेंपो क्लब'चा निसटता पराभव! सलग सहाव्या विजयासह 'स्पोर्टिंग द गोवा' अग्रस्थानी

SCROLL FOR NEXT