Kidney Damage Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Damage Symptoms: किडनी खराब झाल्यावर पायांमध्ये दिसतात 'ही' लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

Kidney Health: किडनी ही शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. तिचं मुख्य काम म्हणजे रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आणि पाण्याचं संतुलन राखणे. पण अनेकदा आपण किडनीचं आरोग्य दुर्लक्षित करतो.

Sameer Amunekar

किडनी ही शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. तिचं मुख्य काम म्हणजे रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आणि पाण्याचं संतुलन राखणे. पण अनेकदा आपण किडनीचं आरोग्य दुर्लक्षित करतो. सुरुवातीला किडनीवर परिणाम होत असतानाच्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण ती फारशी स्पष्ट नसतात. मात्र शरीर काही खास इशारे देतं. विशेषतः पायांभोवती दिसणारी लक्षणं हे किडनीच्या आरोग्याचे अत्यंत महत्वाचे संकेत असू शकतात.

किडनी खराब झाल्यास पायांमध्ये दिसणारी लक्षणे

सूज: किडनी योग्यरित्या काम करत नसल्यास शरीरातील पाणी आणि मीठ बाहेर टाकलं जात नाही. यामुळे ते शरीरात साचू लागतं, परिणामी पाय, टाचं, घोटे या भागांमध्ये सूज दिसते. ही सूज सुरुवातीला सौम्य असते, पण नंतर ती वाढत जाते. चालताना जडपणा, थोडीशी वेदना जाणवू शकते.

त्वचेच्या रंगात बदल व खाज: किडनीची कार्यक्षमता घटली की शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जात नाहीत. त्यामुळे त्वचा कोरडी, खवखवीत होऊ शकते, तसेच पुरळ किंवा खाज यांसारख्या समस्या दिसतात. पायांभोवती त्वचा गडद, लालसर, किंवा खवखवीत वाटू शकते.

पाय थंड पडणे: रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे पायांमध्ये सतत थंडी जाणवते किंवा कमकुवतपणा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यातही पाय थंडसर वाटत असतील तर ही किडनी समस्येची एक शक्यता असू शकते.

स्नायू आखडणे: किडनीमध्ये बिघाड झाल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते – विशेषतः कॅल्शियम आणि पोटॅशियम. यामुळे रात्री झोपताना पायाच्या स्नायूंमध्ये अचानक आखडणे, वेदना होणे यासारखी लक्षणं जाणवू शकतात.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपाय

  • दररोज पुरेसे पाणी प्या – किमान ८ ते १० ग्लास

  • मीठाचे सेवन कमी करा – फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्न टाळा

  • नियमित व्यायाम करा – चालणे, योगासने, मेडिटेशन

  • मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित चाचण्या करा

किडनीचा त्रास अनेकदा सुरुवातीला सांकेतिक स्वरूपात दिसतो, आणि पायांभोवतीची बदलती लक्षणं त्याचे पहिले इशारे असू शकतात.

त्यामुळे जर तुमच्या पायांमध्ये सूज, खाज, स्नायू आखडणे किंवा थंडी जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास किडनीचे नुकसान टाळता येऊ शकते. वेळेत लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. दैनिक गोमन्तक अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT