Vastu Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: शांत झोप, नकारात्मक उर्जा दूर ठेवण्यासाठी झोपताना डोक्याखाली 'या' वस्तू ठेवा

गोमन्तक डिजिटल टीम

वास्तुशास्त्रात (Vastushastra) सुखी जीवन जगण्यासंबधी अनेक उपाय व नियम सांगितले आहेत. त्याचे काटेकोर पालन केल्यास माणूस सुखी - समाधानी आयुष्य जगू शकतो. घरात ठेवण्याच्या वस्तू पासून ते घरात कोणती वस्तू कुठे असावी याबाबत वास्तुशास्त्र सविस्तर माहिती देते. तसेच, झोपताना देखील काही वस्तू जवळ ठेवल्यास किंवा उशाखाली ठेवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असे वास्तुशास्त्र सांगते. तर, अशा कोणत्या वस्तू आहेत त्याबाबत आपण माहिती पाहूयात.

पाण्याने भरलेला तांब्या जवळ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार झोपताना पलंगाच्या जवळ पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी कोणत्याही झाडाला टाका. असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आरोग्य चांगले राहील.

चाकू

झोपेत असताना भीतीदायक स्वप्ने पडल्याने दचकून अनेकजण उठतात. असा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या पलंगाखाली लोखंडी चाकू ठेवू शकता. चाकू नसेल, तर कात्री किंवा इतर कोणतीही लोखंडी वस्तू ठेवू शकता.

लसूण

वास्तुशास्त्रात लसूण हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला कमी झोप येत असेल किंवा नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर रात्री झोपताना उशीखाली लसणाच्या काही पाकळ्या ठेवाव्यात, यामुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

बडीशेप

जन्मकुंडलीतील राहू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बडीशेपचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे एका कागदात थोडी बडीशेप गुंडाळून बेड किंवा उशीखाली ठेवा. यामुळे वाईट स्वप्नेही दूर राहतील आणि तुम्ही तणावमुक्त राहाल.

वेलची

वास्तुशास्त्रात वेलचीला खूप महत्त्व आहे. याचे सेवन केल्याने माणसाला चांगली झोप लागते, याचसोबतच आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे झोपताना वेलची डोक्याखाली ठेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT