काश्मिरी लसूणला (Kashmiri Garlic) हिमालयीन लसूण (Himalayan Garlic) या नावाने ओळखले जाते. यालाच पोथी लसूण देखील म्हटल्या जाते. काश्मिरी लसूण एकाच कळीचे असते. या लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा घटक असतो यामुळे याची चव खूप तिखट असते. काश्मिरी लसूण सामान्य लसूणापेक्षा सात पटीने अधिक प्रभावी असते. काश्मिरी लसूणमध्ये (Kashmiri Garlic) पोषक तत्वे (Nutrients) मुबलक प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस , सेलेनियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, मॅंग्नेशिअम यासारखे पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने मधुमेह (Diabetes) , हृदयरोग (Heart disease) आणि उच्च रक्तदाब (High blood pressure) यासारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
* काश्मिरी लसूनचे फायदे
* मधुमेहावर उपयुक्त
काश्मिरी लसूण (Kashmiri Garlic) हा मधुमेह असणाऱ्या रुग्णासाठी लाभदायी आहे. या लसूणचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. एका संशोधनानुसार, या लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या नियमितपणे खाल्ल्याने मधुमेह असणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
* उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवतो
ज्या लोकांचा उच्च रक्तदाब नेहमी उच्च असतो, अशा लोकांनी काश्मिरी लसूणचे सेवन करणे फायद्याचे आहे. काश्मिरी लसूण (Kashmiri Garlic) शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करते. तसेच ट्रायग्लिसराईड 20 टक्के कमी करतो. आरोग्यतज्ञांच्या मते, काश्मिरी लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यामुळे काश्मिरी लसूणचे सेवन करावे.
* कॅन्सरवर उपयुक्त
काश्मिरी लसूणमध्ये (Kashmiri Garlic) व्हिटॅमिन सी, फॉस्फरस , सेलेनियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, मॅंग्नेशिअम यासारखे पोषक घटक असतात. यामुळे कर्करोगापासून बचाव होण्यास मदत मिळते. नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाच्या संशोधनात असे आढळून आले की जे लोक काश्मिरी लसूणचे (Kashmiri Garlic) सेवन करतात त्या लोकांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
* सर्दी आणि खोकल्यावर उपयुक्त
काश्मिरी लसणाचा (Kashmiri Garlic) वापर सर्दी आणि खोकला बरा होण्यासाठी देखील वापरतात. जे लोक या लसणाचे सेवन करतात त्या लोकांना सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासून सुटका मिळते. तसेच अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.