Mata Lakshmi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kartik Purnima 2023: कार्तिक पौर्णिमेला 'या' चुका करू नका, अन्यथा... माता लक्ष्मी होईल नाराज

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला खुप महत्व आहे.

Puja Bonkile

Kartik Purnima 2023: हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी आणि चंद्र यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. पचांगनुसार वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा तिथी असतात. यापैकी एक म्हणजे कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नियमांचे पालन केले पाहिजे, तरच पूजेचे फळ मिळते. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही काम केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असे शास्त्रात मानले जाते. यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते. त्याचबरोबर एखादे काम करणे टाळावे अन्यथा चंद्राचे प्रतिकूल परिणाम होतील.

  • कार्तिक पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये?

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र नदीत स्नान करावे. या दिवशी नदीत आंघोळ केल्याने नकारात्मकता तर दूर होतातच पण अनेक आजारांपासून दूर देखील राहतात.  

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच तिच्या स्तोत्राचेही पाठ केले पाहिजे. असे केल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आणि आशीर्वादही राहतो. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मासांहार करणे टाळावे. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नका. त्यामुळे उपासनेत दोष निर्माण होतो. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरात अंधार ठेवू नका. अंधार पडल्यावर माता लक्ष्मी परत येते. तसेच या दिवशी दूध किंवा चांदीचे दान करू नका. यामुळे चंद्र दोष निर्माण होतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT