निरोगी आयुष्य सर्वांनाच हवं असतं, पण त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ कोणाकडेच नसतो. दररोजची धावपळ, ऑफिसच्या कामांचा ताण यामुळे नियमित योगासने, व्यायाम करणे शक्य होत नाही. मात्र निरोगी आयुष्यासाठी शरीर सक्रिय ठेवणं गरजेचं आहे. बदललेली जीवनशैली, अवेळी आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे पोटाशी निगडीत समस्या अनेकांना त्रस्त करत आहेत. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नियमित सुप्त भद्रासनाचा सराव सरावा. (Joints below the waist becomes loose due to Supta Bhadrasana)
सुप्त भद्रासन कसे करावे?
जमिनीवर किंवा योग मॅटवर सरळ पाठीवर झोपा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या पायाची टाच डाव्या पायाच्या दिशेला ठेवा. हीच कृती आता डाव्या पायाने करून दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना चिटकवा. आता दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा.
सुप्त भद्रासन करण्याचे फायदे कोणते?
- स्वास्थ्य, आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणारे हे आसन आहे.
- अंडाशय, प्रोस्टेट ग्रंथी, मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रिय करण्यास मदत करते.
- शांतता आणि विश्रांती मिळते.
- निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत मिळते.
- पचनयंत्रणा आणि प्रजनन प्रक्रियेचे कार्य सुरळीत होते.
- मासिक पाळीचे विकार, रजोनिवृत्ती, वंध्यत्व आणि आतड्यांच्या हालचाली सुलभ करते.
- चिंता, ताण, तणाव, नैराश्य कमी करण्यास मदत होते.
- पाठदुखीसाठी हे आसन फायदेशीर ठरते.
- कमरेखालील सांधे मोकळे होतात.
- हे आसन करताना ओटीपोटाचा भाग, मांड्याचा आतील भाग आणि गुडघ्यांना आवश्यक प्रमाणात चांगला ताण जाणवतो.
- कमरेखालील आणि गुडघ्यांवरील स्नायूंना पुरेसा ताण मिळतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.