Wearable Smart Devices Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mental Stress: मानसिक तणावासाठी वापरा ‘हे’ डिव्हाईस, वेळेवर उपचार मिळण्यास होईल मदत!

Wearable Smart Devices: भारतीय शास्त्रज्ञांनी ताण ओळखण्यासाठी एक डिव्हाइस विकसित केले आहे. हे डिव्हाइस परिधान केल्याने ताण ओळखता येतो.

Manish Jadhav

Wearable Smart Devices: आज प्रत्येकजण मानसिक ताणतणावाच्या समस्येशी झुंजत आहे. ताणतणावाची पातळी इतकी वाढली आहे की लोक छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करतात. बऱ्याचदा लोकांचा राग नियंत्रणात राहत नाही, ज्यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सहन करावे लागते. देशातील शास्त्रज्ञही ताण कमी करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन करत आहेत. या संदर्भात, भारतीय शास्त्रज्ञांनी ताण ओळखण्यासाठी एक डिव्हाइस विकसित केले आहे. हे डिव्हाइस परिधान केल्याने ताण ओळखता येतो. हे आधुनिक आणि स्मार्ट वॉचबेल डिव्हाइस व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल देखील माहिती देईल. याशिवाय, हे तंत्रज्ञान रोबोटिक सिस्टीममध्येही सुधारणा करु शकते.

स्मार्ट हेल्थ डिव्हाइस

बंगळुरुच्या जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) येथील शास्त्रज्ञांनी एक स्मार्ट हेल्थ डिव्हाइस विकसित केले आहे. याद्वारे ताणतणावाची पातळी ओळखता येते. शास्त्रज्ञांनी चांदीच्या तारेचा वापर करुन एक आधुनिक डिव्हाइस तयार केले आहे.

हे डिव्हाइस सेन्सरशिवाय काम करेल

दरम्यान, हे डिव्हाइस कोणत्याही बाह्य सेन्सर किंवा सेटअपशिवाय लोकांच्या ताणतणावाचा शोध घेण्यासाठी योग्य आहे. हे प्रगत आरोग्य देखरेख प्रणाली विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. याशिवाय, हे डिव्हाइस आरोग्याची स्थिती आणि ताण ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. ते तुम्हाला वेळेत सांगेल की, सध्या तुमच्या शरीरात ताणाची पातळी काय आहे आणि तुमच्या शरीराची स्थिती काय आहे. शिवाय, डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या ताणतणावाची पातळी समजून घेण्यास देखील मदत होईल.

ताण जाणून घेण्यासाठी हे डिव्हाइस उपयुक्त

आजकाल अनेक प्रकारचे आजार ताणतणावामुळे होतात. ताणतणाव केवळ मानसिक आरोग्यच बिघडवत नाही तर शारीरिक आरोग्यावरही त्याचा खोलवर परिणाम होतो. मात्र असे डिव्हाइस ताणतणावाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यात आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यात उपयुक्त ठरु शकते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा आणि तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यास देखील हे मदत करेल.

डिव्हाइसचा फायदा काय?

तज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खराब असेल तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो. मानसिक ताणामुळे मधुमेह आणि हृदयरोग देखील होऊ शकतो. बहुतेक लोकांना हे कळत नाही की ते मानसिक ताणतणावात आहेत. अशा परिस्थितीत, जर कोणत्याही डिव्हाइसने ते शोधले तर ते खूप फायदेशीर ठरेल. लोकांना वेळेत कळेल की, ते तणावात आहेत आणि यामुळे उपचार देखील सोपे होतील.

रोबोटमध्येही या डिव्हाइसचा वापर केला जाऊ शकतो

हे इतके लवचिक आणि स्मार्ट डिव्हाइस आहे की, ते तुटल्यानंतरही स्वतःला दुरुस्त करता येऊ शकते. ज्याप्रमाणे आपली मज्जासंस्था आपल्याला शरीरातील वारंवार होणाऱ्या वेदनांबद्दल सांगत राहते, त्याचप्रमाणे हे डिव्हाइस देखील ताण ओळखते आणि त्याबद्दल सांगते. हे डिव्हाइस रोबोटमध्ये देखील वापरले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT