iPhone 15 Series Bumper Discount Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Apple लव्हर्ससाठी खुशखबर! iPhone 15 सिरीजवर धमाकेदार ऑफर...मिळू शकतो 60 हजारपर्यंतचा डिस्काउंट

Kavya Powar

iPhone 15 Series Bumper Discount: iPhone 15 लॉंच झाल्यापासून ग्राहकांनी फोन ऑर्डर करण्यास सुरुवात केली आहे. Apple India iPhone 15 सिरीजसाठी प्री-ऑर्डर स्वीकारत आहे. iPhone 15 ची अधिकृत विक्री येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

यातच iPhone लव्हर्ससाठी खुशखबर समोर आली असून, iPhone 15 खरेदी करणाऱ्यांना घसघशीत डिस्काऊंट मिळणार आहे. अधिकृत साईटवर दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 15 सीरीजवर तुम्हाला तब्बल 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

ही ऑफर त्यांच्या दिल्ली आणि मुंबईतील रिटेल आउटलेटवर तसेच त्यांच्या ऑनलाइन वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला iPhone 15 सीरीज खरेदीवर थेट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

iPhone 15 वर सूट

iPhone 15 ची लॉन्चिंग किंमत 79,900/- रुपये आणि iPhone 15 Plus ची लॉन्चिंग किंमत 89,900/- रुपये आहे. Apple कडून या दोन्ही स्मार्टफोन्सवर डायरेक्ट डिस्काउंट मिळणार आहे. ज्यामध्ये iPhone 15 वर 3000 रुपयांची सूट आणि iPhone 15 Plus वर 4000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच, या दोन्ही फोनवर 55,700/- रुपयांची एक्सचेंज ऑफरसुद्धा उपलब्ध आहे; ज्यामध्ये तुम्ही तुमचा जुना फोन देऊ शकता. जुन्या फोनच्या सध्याच्या स्थितीनुसार ही ऑफर उपलब्ध असेल.

iPhone 15 pro आणि iPhone 15 Po max वर सूट

iPhone 15 Pro ची लॉन्चिंग किंमत 1,34, 900/- रुपये आहे आणि iPhone 15 Pro Max ची लॉन्चिंग किंमत 1,59,900 रुपये आहे. Apple कडून या दोन्ही फोनवरही डायरेक्ट डिस्काउंट मिळणार आहे.

iPhone 15 Pro वर 6000 रुपये आणि iPhone 15 Pro Max वर 5000 रुपयांची सूट मिळेल. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला iPhone 15 pro आणि iPhone 15 Po max वर 55,700/- रुपयांची सूट मिळेल, जी जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीनुसार ठरवली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT