Investment Tips For Women Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Investment Tips: बचत नव्हे कमाई! 'या' योजनांमधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर, वाचा एका क्लिकवर

प्रत्येकजण कितीही कमावत असला तरीही शिस्त आणि आर्थिक नियोजनाने बचत करता येते.

Puja Bonkile

Investment Tips: कमी उत्पन्न असलेले लोक बचत करण्यासाठी सतत धडपड असतात; कारण त्यांच्याकडे खर्चानंतर पुरेसे पैसे शिल्लक राहात नाहीत किंवा त्यांना बचत करण्याची सवय नसते. प्रत्येकजण कितीही कमावत असला तरीही शिस्त आणि आर्थिक नियोजनाने बचत करता येते. बचत करायची असेल तर ती कोणत्या योजनांमध्ये करावी याची माहिती नसते. तर आज आपण अशाच काही योजनांची किंवा कुठे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल याची माहिती घेऊया.

  • तुमचे पैसे कुठे गुंतवायचे

गुंतवणुकीसाठी बँका आणि पोस्ट ऑफिस हे उत्तम पर्याय आहेत. यामध्ये परतावा कमी असतो पण जोखीम नगण्य असते. याशिवाय तुम्ही सोने आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करू शकतात. रिअल इस्टेटला परतावा मिळण्यास बराच वेळ लागतो आणि सोन्याच्या शुद्धतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

  • म्युच्युअल फंड आणि एसआयपी

तुमच्यासाठी म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे गुंतवणुकीचे सोपे आणि उत्तम पर्याय असू शकतात. इक्विटी फंडांमध्ये जोखीम आणि परताव्याची क्षमता जास्त असते. यानंतर हायब्रीड फंड आणि डेट फंड येतात. इक्विटी फंड दीर्घ मुदतीसाठी असतात तर डेट फंड अल्प मुदतीसाठी असतात. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) फक्त 500 रुपये प्रति महिना सुरू करता येतो.

  • गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते

गुंतवणूक करतांना अनावश्क खर्च कमी होतो.

गुंतवणूक योग्यवेळी केली तर भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

गुंतवणूक करताना योग्यवेळी केल्यास भविष्य सुरक्षित होऊ शकते.

योग्यवेळी केलेली गुंतवणूक मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी उपयोगी येते.

तसेच गुंतवणूक केल्यामुळे आर्थिक बचत करण्याची सवय लागते.

(लक्षात ठेवा - शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या अर्थतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT