International Carrot Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

International Carrot Day 2023: जाणून घ्या गाजराबद्दल या रंजक गोष्टी!

गाजर खाण्याच्या महत्वाबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

Health Benefits of Carrot: जगभरात 4 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय गाजर दिन म्हणून साजरा केला जातो. गाजरपासुन अनेक पदार्थ बनवले जातात. गाजर खाण्याच्या महत्वाबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सध्याचे धावपळीचे जीवनमान पाहता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी फार वाईट आहेत. अशावेळी गाजर दिवस साजरा करण्याची गरज तर फारच जाणवते. जागतिक गाजर दिन हा गाजराच्या विविध जातींबद्दल जाणून घेण्याची एक उत्तम संधी आहे. चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी!

  • का साजरा केला जातो गाजर दिवस

आंतरराष्ट्रीय गाजर दिन 2003 मध्ये स्थापित करण्यात आला. 2012 पासून तो जगभरात पसरला होता. गाजराचे वनस्पति नाव डॉकस कॅरोटा आहे. आशियातील लोकांनी गाजराची लागवड सर्वप्रथम सुरू केली.

तिथूनच गाजर जगातील इतर देशांत पोहोचले असे तज्ज्ञांचे मत आहे. गाजराचे उगमस्थान पंजाब आणि काश्मीरमधील डोंगराळ भागात होते. लाल, पिवळा केशरी आणि काळा अशा रंगात हे गाजराचे पिक घेतले जाते. प्रत्येक रंगाच्या गाजराचे वेगेवगेळे फायदे आहेत.

  • गाजर खाण्याचे फायदे

गाजराचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन हे ल्युटीन नावाचे सेंद्रिय रंगद्रव्य आहे जे गाजरात भरपूर प्रमाणात आढळते. बीटा कॅरोटीनमुळे वयासोबत होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

गाजर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट हृदयासाठी फायदेशीर असतात.

गाजरात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

गाजरातील फायबरमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर काही कच्च्या गाजरांचा आहारात समावेश करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: सुपारी काढायला गेल्या, पाय घसरला अन पडल्या तळ्यात; ज्येष्ठ महिलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Rama Kankonkar: सरकार पक्ष अपयशी! काणकोणकर हल्ला प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडी नाकारली

World Tourism Day: इंटरनेट नाही, पण सोशल मीडियावर हिट! नेटवर्क नसलेल्या कोकणातील गावांच्या सौंदर्याची कहाणी, 'कोकणी रानमाणसा'च्या शब्दांत

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT