Natural Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Biodiversity: फायदा नेमका कोण लाटतोय!

International Biological Diversity Day: भारताच्या जैवविविधता संपदेबाबत असे म्हटलं जातं की देशाची ही संपन्न जैवविविधता स्थानिक समुदायाबरोबर नीट वाटली जात नाही

दैनिक गोमन्तक

येत्या रविवारी 22 मे रोजी जग जैवविविधता दिन (International Biological Diversity Day) साजरा करा करणार आहे. भारताच्या जैवविविधता संपदेबाबत असे म्हटलं जातं की देशाची ही संपन्न जैवविविधता स्थानिक समुदायाबरोबर नीट वाटली जात नाही. आपल्या गोव्याचेचे (Goa) उदाहरण घ्यायचे झाल्यास, या राज्याचे आज झपाट्याने शहरीकरण होत चालल्याचे स्पष्ट दिसते. जैवविविधतेच्या दृष्टीने पाहता गेल्या पन्नास वर्षात अनियोजित आणि शाश्वत शहरीकरणामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झालेला स्पष्ट जाणवतो आहे आणि सरकारला स्थनिकांचा रोषही ओढवून घ्यावा लागत आहे.

आज आपण अशा जगात वावरत आहोत जिथे तंत्रज्ञान आणि नव्या कल्पनांनी एक उत्तुंग शिखर गाठले आहे. जर असल्याच प्रगतीशी जुळवून घेणे हाच जीवनात पुढे जाण्याचा मार्ग असेल तर, मानवी हस्तक्षेपामुळे ग्रहावर येऊ घातलेल्या हवामान बदलाच्या संकटाची ओळख आणि जाणीवही मानवास असणे आवश्यक आहे. हवामान संकट हे जैविक साधनांचे शोषण, उर्जास्त्रोतांचा अतिवापर आणि हानिकारक वायूंचे प्रज्वलन या साऱ्याशी संबंधित असलेली एक दुर्दैवी बाब आहे.

आज भारत जगाच्या जैविक विविधतेतील योगदानासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. कारण तो एक विस्तीर्ण जैवविविधता असलेल्या प्रदेशांचा देश आहे आणि भारतासाठी (India) जैवविविधतेचे रक्षण होणे अनेक कारणांसाठी आवश्यक आहे त्यापैकी महत्वाचे असलेले एक म्हणजे भारतातल्या बहुसंख्य लोकांसाठी ते उपजीविकेचेही साधन आहे.

रियो अधिवेशनाला स्वीकारून 30 वर्षे आणि भारतात जैवविविधता कायदा लागू होऊन 20 वर्षे झाली लोटली आहेत. या दोन्हींचे उद्दिष्ट जैवविविधतेचे संवर्धन हेच होते. जैवविविधतेचा शाश्वत वापर करून, त्यांचे रक्षण करणाऱ्या लोकांबरोबर त्याचे फायदे न्याय्यपणे वाटले जातील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष पाहिले गेले असता या दोन्हीमार्फत जैवविविधतेचे संरक्षण झालेले दिसत नाही.

देशाच्या जैविक विविधतेचे हे महत्व ओळखून आणि तिची होणारी अक्षम्य हेळसांड जाणून ‘डाऊन टू अर्थ’ने ‘द बायोडायव्हर्सिटी ब्रोउव्हा: हु प्रॉफिट्स’ या वेबिनारचे आयोजन, उद्या 20 रोजी सायंकाळी 4 वाजता केले आहे. या वर्च्युअल चर्चासत्रात भाग घ्यायचे असल्यास https://us02web.zoom.us/webinar/register/WN_jPg6STItRnGuld-G0E5GUA ही लिंक वापरून आपण स्वतःची नोंदणी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT